शनिवार, 23 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. पुणे
Written By
Last Modified: शुक्रवार, 28 ऑगस्ट 2020 (08:56 IST)

आदर्श घ्यावा असा, पुण्यात मानाच्या गणपतींचे उत्सव मंडपातच विसर्जन

कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर पुण्यातील मानाच्या गणरायाच्या मूर्तीचे विसर्जन देखील सांगता मिरवणूक न होता उत्सव मंडपातच केले जाणार आहे अशी माहिती मानाच्या आणि प्रमुख गणपती मंडळाच्या अध्यक्षांनी पत्रकार परिषदेत दिली.
 
यावेळी पत्रकार परिषदेत मंडळाचे पदाधिकारी म्हणाले की, पुणे शहराचे महापौर मुरलीधर मोहोळ हे सकाळी १०.३० वाजता श्री कसबा गणपतीला पुष्हाहार अर्पण करती व सकाळी ११.३० वाजता कसबा मंडळाच्या गणपती मूर्तीचे विसर्जन होईल. श्री तांबडी जोगेश्वरी गणपती मूर्तीचे विसर्जन दुपारी १२ वाजून २५ मिनिटांनी  होईल, श्री गुरुजी तालीम मंडळाच्या गणपती मूर्तीचे दुपारी १ वाजता, श्री तुळशीबाग मंडळाच्या गणपती मूर्तीचे दुपारी १ वाजून ४५ मिनिटांनी व केसरी वाड्यातील गणेश मूर्तीचे दुपारी २ वाजून ३० मिनिटांनी विसर्जन होणार आहे. याचबरोबर श्रीमंत भाऊ भाऊसाहेब रंगारी मंडळाच्या गणपती मूर्तीचे दुपारी ३.१५ मिनिटांनी, श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंडळाच्या गणेश मूर्तीचे सूर्यास्ताच्या वेळी व अखिल मंडई मंडळाचा गणपती मूर्तीचे सायंकाळी सात वाजता विसर्जन होणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले. 
 
तर  सोमवार ३१ ऑगस्ट रोजी पूर्वसंध्येला मंडळांचे अध्यक्ष आणि पदाधिकारी एकत्रपणे केसरी वाडयात आरती करुन लोकमान्यांना मानवंदना देणार असल्याचे त्यांनी सांगितले.