शनिवार, 28 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. आयटी जगत
  3. आयटीच्या जगात
Written By
Last Modified: सोमवार, 17 जुलै 2023 (22:33 IST)

BSNL 4G सेवा सुरू, ग्राहकांना मिळणार सुपरफास्ट इंटरनेट

BSNL 4G Launch: सरकारी दूरसंचार कंपनी BSNL ने एअरटेल, व्होडाफोन आयडिया सारख्या बड्या टेलिकॉम कंपन्यांना टक्कर देण्यास सुरुवात केली आहे. आपल्या सर्वांना माहित आहे की कंपनीच्या 4G नेटवर्कबद्दल बर्याच काळापासून चर्चा सुरू होती, आता लोकांची प्रतीक्षा संपली आहे. BSNL ने त्यांच्या 4G नेटवर्कची यशस्वी चाचणी घेतली आहे, आणि 4G सेवा सुरू केल्याने ग्राहकांना खूप आनंद झाला आहे.
 
BSNL ने सर्वप्रथम आपली 4G सेवा पंजाबमधील अमृतसर येथे सुरू केली आहे. मात्र, सध्या कंपनीने 4G ची फक्त बीटा ट्रायल सादर केली आहे. याचा अर्थ असा की सुरुवातीला फक्त काही वापरकर्त्यांना 4G प्रीपेड सिम मिळेल, त्यानंतर नेटवर्क गुणवत्तेबाबत त्यांचा फीडबॅक घेतला जाईल. कारण सर्वांसमोर आणण्यापूर्वी काही कमतरता असल्यास ती दुरुस्त करता येऊ शकते.
 
कंपनीने आता फिरोजपूर, पठाणकोट आणि अमृतसरमध्ये 4G नेटवर्कसाठी 200 लाईव्ह नेटवर्क साइट्स उपलब्ध करून दिल्या आहेत. बीएसएनएलच्या बीटा ट्रायलनंतर येत्या काही महिन्यांत संपूर्ण देशात 4जी सेवा सुरू केली जाऊ शकते, असे म्हणणे चुकीचे ठरणार नाही. 2023 च्या अखेरीस देशातील सर्व भागात 4G सेवा उपलब्ध करून देण्याचे BSNL चे उद्दिष्ट आहे.
 
BSNL देशभरात 1 लाखाहून अधिक 4G नेटवर्क तयार करणार असून यासाठी टाटासह इतर कंपन्यांना ऑर्डर देण्यात आली आहे. रिपोर्टनुसार, बीएसएनएलने टाटाला सर्वात मोठी ऑर्डर दिली आहे.
 
वर्षाच्या अखेरीस एक मोठा अपडेट येईल
गेल्या महिन्यात, दूरसंचार मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितले होते की सरकारी बीएसएनएल येत्या दोन आठवड्यांत 200 ठिकाणी 4G सेवा देऊ करेल. यासोबतच त्यांनी सांगितले की, यावर्षी नोव्हेंबर-डिसेंबरपर्यंत BSNL चे 4G नेटवर्क 5G वर अपग्रेड केले जाईल.
 
त्यांनी सांगितले की BSNL ने TCS आणि ITI ला 4G नेटवर्क उभारण्यासाठी 19,000 कोटी रुपयांहून अधिकची आगाऊ ऑर्डर दिली आहे. देशभरात १.२३ लाखाहून अधिक ठिकाणी ही उपकरणे बसवली जातील.
 
वैष्णव म्हणाले, 'बीएसएनएल ज्या वेगाने नेटवर्क उभारणार आहे ते पाहून तुम्हाला आश्चर्य वाटेल. तीन महिन्यांच्या चाचणीनंतर, आम्ही एका दिवसात 200 ठिकाणी नेटवर्क उभारण्यास सुरुवात करू.