रविवार, 1 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. आयटी
  3. आयटीच्या जगात
Written By

टचस्क्रीनद्वारे जाणून घेता येईल डॉल्फिनचे वर्तन

शास्त्रज्ञांनी डॉल्फिनची बुद्धिमता आणि संचार क्षमतेबाबत जाणून घेण्यासाठी आठ फूट लांबीचा एक टचस्क्रीन विकसित केला आहे. हा टचस्क्रीन पाण्यामध्ये ठेवला जाऊ शकतो. डॉल्फिनला या सिस्टिमसोबत जोडण्यासाठी एका खास अॅपची निर्मिती करण्यात आली आहे.
 
एक प्रतिकात्मक बोर्डाचीही व्यवस्था करण्यात आली आहे. अन्य प्राण्यंच्या तुलनेत डॉल्फिन बुद्धिमान असण्यासोबत अतिशय सामाजिक जीवसुद्दा आहे. डॉल्फिनसाठी या टचस्क्रीनला अशा प्रकारे स्थापन करण्यात आले आहे की त्याचा कोणताही हिस्सा पुलाच्या आत राहत नाही.
 
त्याच्या स्पर्शाबाबत प्रकाशीय संकेताद्वारे समजते. शास्त्रज्ञांनी डॉल्फिनच्या आवाजाचे अध्ययन करून आणि प्रतिकात्मक संचार क्षमतेबाबत जाणून घेण्याच्या दिशेने प्रयत्न सुरू केले आहे. या माध्यमातून शास्त्रज्ञ ज्या सजीवांकडे आयटम, व्हिडिओ आणि  प्रतिमेसाठी अनुरोध करण्याची क्षमता असेल, त्यांचे वर्तन कशा प्रकाराचे असेलल हेही जा़णून घेणार आहेत.