शुक्रवार, 8 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. आयटी
  3. आयटीच्या जगात
Written By

फेसबुकचे नवे फीचर, यूजर्ससाठी फायदेशीर

फेसबुकचे कार्यकारी अधिकारी मार्क जकरबर्ग यांनी म्हटले की सोशल नेटवर्किंग साईट गोपनीयतेच्या सुरक्षेसाठी नवीन फीचर 'क्लियर हिस्ट्री' लाँच करणार आहे ज्याने यूजर्स आपली ब्राउझिंग हिस्ट्री हटवू शकतील.
 
जकरबर्ग यांनी म्हटले की फेसबुकमध्ये हे फीचर जुळविण्यासाठी काही महिने लागू शकतात. कंपनी या संबंधात वकील, नीती निर्माते, शिक्षणतज्ज्ञ आणि विनियमांची मदत घेणार. जकरबर्ग या नवीन फीचरची तुलना ब्राउझरहून कुकीज हटवण्यासाठी करतात.
 
अमेरिकी कॉग्रेस समक्ष वक्तव्य देण्याच्या माझ्या अनुभवावरून मी शिकलो की माझ्याकडे डेटा संबंधी काही प्रश्नांचे स्पष्ट उत्तर नाही, असे त्यांनी म्हटले.
 
काय खास आहे या फीचरमध्ये: 
कंपनीने आपल्या ब्लॉग पोस्टमध्ये म्हटले की 'या फीचरमुळे आपण आम्हाला सूचना पाठवणार्‍या साईट आणि अॅप या रूपात बघू शकाल. यानंतर आपण आपल्या अकाउंटहून याहून जुळलेल्या सूचना हटवू शकता. यानंतर याबद्दल माहिती आपल्या अकाउंटसह स्टोअर होणार नाही.
 
उल्लेखनीय आहे की राजनैतिक फायद्यासाठी फेसबुक डेटा वापरण्यात आल्याचे प्रकरण समोर आल्यावर कंपन्यांद्वारे यूजर्सच्या डेटा सुरक्षेबद्दल सधन तपासणी चालू आहे.