फेसबुकचे ऑटो प्ले व्हिडीओ हे नवे अपडेट
फेसबुकने ऑटो प्ले व्हिडीओ हे नवं अपडेट दिलं आहे. या नव्या फिचरमुळे फेसबूकवर व्हिडीओ पाहताना सोबत ऑडिओही ऐकायला मिळणार आहे. याआधी आपण जेव्हा स्क्रोल करत असताना एखादा व्हिडीओ आला की तो ऑटो प्ले व्हायचा मात्र त्याचा ऑडिओ म्यूट असायचा. ऑडिओसाठी तो व्हिडीओ ओपन करुन ऑप्शनमध्ये जाऊन सुरु करावा लागत असे. मात्र नव्या अपडेटनुसार फेसबुकवरील व्हिडीओ ऑटो प्ले झाल्यानंतर ऑडिओही सुरु होईल. त्यासाठी वेगळं क्लिक करण्याची गरज यूझर्सना पडणार नाही. फेसबुकने पर्याय उपलब्ध केला फेसबुकच्या सेटिंगमध्ये जाऊन ऑटो प्ले ऑफ करता येणार आहे. ज्यामध्ये हे फीचर डिसेबल करण्याची सुविधा उपलब्ध आहे. तसंच फोन सायलेंट मोडवर असताना ऑटो प्ले ऑडिओ होणार नाही याची काळजी फेसबुकने घेतली आहे.