शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. आयटी
  3. आयटीच्या जगात
Written By

'गुगल' जगातील सर्वात लोकप्रिय ब्रॅंड

अॅपलला मागे टाकून गुगल  जगातील सर्वात लोकप्रिय ब्रॅंड बनला आहे. २०१७ मध्ये सर्वात लोकप्रिय आणि जास्त किंमत असलेला जगातील सर्वात मोठा टेक्नॉलॉजी ब्रॅंड म्हणून गुगल पुढे आला आहे. ब्रॅंड फायनान्स या कंपनीने केलेल्या सर्वेक्षणात हे सांगितले आहे. ब्रॅंड फायनान्सनुसार गुगलची किंमत १०९.४ अब्ज डॉलर (७,१९४ अब्ज कोटी रुपये) आहे. २०११ पासून अॅपल या स्थानावर होता. आता हे स्थान गुगलने मिळवले आहे. गेल्या काही वर्षांमध्ये गुगलची ब्रॅंड व्हॅल्यू सातत्याने वाढत आहे. मागील वर्षीच्या तुलनेत गुगलने २४ टक्क्यांनी वाढ मिळवली आहे. मागील वर्षी गुगलची ब्रॅंड व्हॅल्यू ८८.२ अब्ज डॉलर (५८०८ अब्ज डॉलर) होती. मागील वर्षी आयफोन ७ आणि ७ प्लस लाँच करुन देखील अॅपलची ब्रॅंड व्हॅल्यू कमी झाली. मागील वर्षी त्यांची ब्रॅंड व्हॅल्यू १४५ अब्ज डॉलर होती यावर्षी ती १०७ अब्ज डॉलर इतकी झाली आहे.