शुक्रवार, 10 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. आयटी
  3. आयटीच्या जगात
Written By

आयडियाचा नवा प्लान : 1.5 जीबी 4 जी डेटा 497 रुपये

आयडिया सेल्यूलरनं आता आणखी एक नवा प्लान आणला आहे. या प्लानमध्ये आयडिया यूजर्सला दररोज 1.5 जीबी 4जी डेटा देणार आहे. हा प्लान 70 दिवसांसाठी वैध असणार आहे. या प्लान किंमत 497 रुपये आहे. डेटाशिवाय या प्लानमध्ये यूजर्सला अनलिमिटेड कॉलिंगही मिळणार आहे. या प्लानमध्ये आयडिया टू आयडिया नेटवर्कलाच अनलिमिटेड कॉलिंग असणार आहे. तर दुसऱ्या नेटवर्कसाठी यूजर्सला 3000 मिनिट फ्री मिळणार आहे. 3000 मिनिटं पूर्ण झाल्यानंतर प्रत्येक कॉलला पैसे मोजावे लागतील.