शनिवार, 25 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. ऑटोमोबाइल
  3. आयटीच्या जगात
Written By
Last Modified: मंगळवार, 26 जानेवारी 2021 (09:15 IST)

टिकटॉकसह ५९ चिनी अ‍ॅप्सवर कायमची बंदी

लडाखमध्ये चिनी सैनिकांसोबत झालेल्या संघर्षानंतर भारताने चिनी अ‍ॅप बंदीची आपली भूमिका अजून कठोर केली असून आता ५९ चिनी अ‍ॅप्सवर कायमची बंदी घालण्यात आली आहे. भारताने काही चिनी अ‍ॅप्सवर तात्पुरत्या स्वरुपासाठी बंदी घातली होती. मात्र आता कायमची बंदी घालण्यात आली आहे. 
 
बंदी घालण्यात आलेल्या अॅपमध्ये अनेक मोठ्या अ‍ॅप्सचा समावेश आहे जसे- TikTok, Baidu, WeChat, UC Browser, Club Factory, Mi Video Call (Xiaomi), BIGO Live इतर
 
केंद्र सरकारने आयटी कायद्याच्या कलम ६९ अ अंतर्गत चिनी अ‍ॅप्सविरोधात कारवाई केली होती. या अ‍ॅप्सकडून भारताच्या सार्वभौमत्व आणि एकात्मकता तसंच सुरक्षेला धोका असल्याचं सांगण्यात आलं होतं.