शुक्रवार, 10 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. आयटी
  3. आयटीच्या जगात
Written By
Last Modified: शनिवार, 3 फेब्रुवारी 2018 (16:56 IST)

जिओची 'गेट अप टू २०० पर्सेंट' कॅशबॅक ऑफर

जिओने गेट अप टू २०० पर्सेंट कॅशबॅक ऑफर सादर केली आहे. या ऑफरमध्ये युजर्संना ७९९ रुपयांचा कॅशबॅक मिळेल. या प्लॅनचा फायदा १५ फेब्रुवारीपर्यंत घेऊ शकता. 

या ऑफरमध्ये जिओ युजर्संने ३९८ रुपये किंवा त्याहुन अधिकचा रिचार्ज केल्यास त्यांना ७९९ रुपयांचा कॅशबॅक मिळेल. ३९८ रुपयांचा रिचार्ज जर जिओ युजर्संने MyJio अॅप किंवा Jio.com ने केल्यास त्यांना १००% म्हणजेच ४०० रुपयांचे इंस्टेंट कॅशबॅक मिळेल. यात तुम्हाला ५०-५० रुपयांचे ८ व्हॉऊचर्स मिळतील. हे व्हाऊचर तुम्ही ३०० रुपयांपेक्षा अधिकचे रिचार्ज करण्यासाठी वापरू शकता. त्याचबरोबर युजर्स ९१ रुपयांहुन अधिकचा रिजार्ज एड-ऑन करण्यासाठी या व्हाऊचरचा वापर करु शकतात.

मोबिक्विक मोबाईल वॉलेटवर देखील जिओच्या नव्या आणि जुन्या ग्राहकांना रिचार्जवर ३९९ रुपयांचा कॅशबॅक मिळेल. रिचार्ज करणाऱ्या नवीन युजर्सला पेटीएमवर ५० रुपयांचा कॅशबॅक तर जुन्या युजर्संना २० रूपयांचा कॅशबॅक मिळेल. तर अॅमेझ़ॉन पे वर ५० रुपये कॅशबॅक मिळेल. फोन पे वॉलेटवर युजर्सला ७५ रुपये आणि फ्रिचार्जवर ५० रुपयांचे कॅशबॅक मिळेल. भीम युजर्सना रिचार्जवर १०० रुपये आणि जून्या युजर्सना ३० रुपये कॅशबॅक मिळेल.