सोमवार, 14 ऑक्टोबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. आयटी जगत
  3. आयटीच्या जगात
Written By
Last Modified: शुक्रवार, 8 सप्टेंबर 2023 (23:14 IST)

जिओ प्लॅटफॉर्म आणि एनव्हीडिया क्लाउड बेस्ट बनवणार सुपर कॉम्प्युटर , मुकेश अंबानीनी त्यांचे वचन पूर्ण केले

* रिलायन्सच्या एजीएममध्ये मुकेश अंबानी यांनी प्रत्येक भारतीयापर्यंत आर्टिफिशियल इंटेलिजेंस पोहोचवण्याचे आश्वासन दिले.
* जिओ प्लॅटफॉर्म आणि एनव्हीडिया  एकत्र आल्याने भारत आर्टिफिशियल इंटेलिजेंसच्या क्षेत्रात एक मोठी शक्ती म्हणून उदयास येईल.
* हे देशातील उद्योगांना अनेक प्रतिस्पर्धी कंपन्यांच्या पुढे जाण्यास मदत करेल.
 
जिओ प्लॅटफॉर्म ने घोषणा केली आहे की ते अत्याधुनिक क्लाउड-बेस्ड आर्टिफिशियल इंटेलिजेंस (AI) पायाभूत सुविधा तयार करण्यासाठी एनव्हीडिया सोबत काम करेल. आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या क्षेत्रात भारत आधीच पुढे काम करत आहे पण जिओ  आणि एनव्हीडिया एकत्र आल्याने भारताला या क्षेत्रात अधिक वेगाने वाढ होण्यास मदत होईल.
 
रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक मुकेश अंबानी यांनी अलीकडेच कंपनीच्या एजीएममध्ये प्रत्येक भारतीयापर्यंत आर्टिफिशियल इंटेलिजन्स पोहोचवण्याचे मोठे वचन दिले. मुकेश अंबानींच्या शब्दात सांगायचे तर, “जिओने सात वर्षांपूर्वी वचन दिले होते की आम्ही ब्रॉडबँड कनेक्टिव्हिटी प्रत्येक भारतीयापर्यंत, सर्वत्र पोहोचवू. आम्ही आमचे वचन पूर्ण केले आहे. आज जिओ वचन देत आहे की देशाच्या कानाकोपऱ्यातील प्रत्येक भारतीयापर्यंत आर्टिफिशियल इंटेलिजन्स पोहोचवू .”
 
या भागीदारीमुळे भारताच्या विकासाला गती येईल, असे मुकेश अंबानी म्हणाले, “भारत भरपूर डेटा वापरत आहे. पण आता आपण त्याहूनही पुढे जात आहोत. आम्ही आता तंत्रज्ञानाच्या पायाभूत सुविधा निर्माण करत आहोत ज्यामुळे देशाच्या जलद विकासात मदत होईल. एनव्हीडिया सोबत आम्ही संगणकीय आणि तंत्रज्ञान सुपरसेंटर तयार करत आहोत. जिओच्या आगमनानंतर डिजिटल क्षेत्रात जी मदत मिळाली होती तशीच मदत देशाला याद्वारे मिळणार आहे. मला आनंद आहे की जिओ आणि एनव्हीडिया एक ध्येय साध्य करण्यासाठी एकत्र येऊन नवीन प्रवास सुरू करत आहेत.”
 
आकाश अंबानी, चेअरमन, रिलायन्स जिओ इन्फोकॉम लिमिटेड, म्हणाले, “जिओमध्ये, आम्ही लोकशाही प्रवेश आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून भारताच्या तंत्रज्ञान क्रांतीला चालना देण्यासाठी वचनबद्ध आहोत.  एनव्हीडिया सोबतचे आमचे सहकार्य या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल आहे. एकत्रितपणे, आम्ही एक प्रगत AI क्लाउड इन्फ्रास्ट्रक्चर विकसित करू जी सुरक्षित, टिकाऊ आणि भारताच्या अनोख्या संधीसाठी अधिकाधिक महत्त्वपूर्ण आहे. हे अत्याधुनिक व्यासपीठ आरोग्यसेवा आणि शिक्षणापासून एंटरप्राइझ सोल्यूशन्सपर्यंतच्या क्षेत्रांमध्ये AI-शक्तीवर चालणाऱ्या नवकल्पनांना गती देण्यास मदत करेल. भारताला AI पॉवरहाऊस बनण्याच्या दिशेने वेगाने पुढे नेण्यासाठी देशभरातील संशोधक, स्टार्ट-अप आणि उद्योगांना AI सुलभ बनवण्याचे आमचे ध्येय आहे.”
 
याप्रसंगी बोलताना,  एनव्हीडिया चे संस्थापक आणि CEO जेन्सेन हुआंग म्हणाले, “भारतात अत्याधुनिक AI सुपर कॉम्प्युटर तयार करण्यासाठी रिलायन्ससोबत भागीदारी करताना आम्हाला आनंद होत आहे. भारताकडे मोठ्या प्रमाणावर डेटा आणि प्रतिभा आहे. सर्वात प्रगत AI संगणकीय पायाभूत सुविधांसह, रिलायन्स ते तयार करू शकते. त्यांच्या कडे उत्तम भाषा मॉडेल्स आहेत.”जे  भारतातील लोकांसाठी भारतात तयार केलेले  जनरेटर AI अॅप्लिकेशन्स ला पॉवर देतात. 
 
नवीन AI क्लाउड इन्फ्रास्ट्रक्चर संपूर्ण भारतातील संशोधक, विकासक, स्टार्टअप्स, शास्त्रज्ञ, AI प्रॅक्टिशनर्स आणि इतरांना वर्कलोड सुरक्षितपणे चालवण्यासाठी आणि अत्यंत ऊर्जा कार्यक्षमतेसह चालविण्यासाठी त्वरित कम्प्युटिंग आणि हाय स्पीड, सुरक्षित क्लाउड नेटवर्किंगमध्ये प्रवेश करण्यास सक्षम करेल.
 
नवीन बेसिक इन्फ्रास्टक्चर सुविधा भारताच्या प्रमुख उपक्रमांना आणि विस्तृत श्रेणीला गती देईल. त्यात  एआय चॅटबॉट्स, औषध शोध, हवामान संशोधन आणि एआय प्रकल्पांचा समावेश आहे. 
 
या नवीन सहकार्याचा भाग म्हणून,  एनव्हीडिया सर्वात प्रगत AI मॉडेल्स तयार करण्यासाठी जिओ ला सीपीयू , जीपीयू , नेटवर्किंग आणि AI ऑपरेटिंग सिस्टम आणि फ्रेमवर्कसह एंड-टू-एंड सुपर कॉम्प्युटर तंत्रज्ञान प्रदान करेल. जिओ  क्लाउड इन्फ्रास्ट्रक्चरचे व्यवस्थापन आणि देखभाल करेल आणि ग्राहक कनेक्ट आणि ऍक्सेसचे निरीक्षण करेल.
 
 
Edited by - Priya Dixit