गुरूवार, 25 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. आयटी
  3. आयटीच्या जगात
Written By
Last Modified: बुधवार, 5 जुलै 2017 (17:28 IST)

व्हॉट्सअॅपकडून नवे नाईट मोड फीचर

इन्स्टंट मोबाईल मेसेजिंग अॅप व्हॉट्सअॅप कायमच  युझरसाठी नवनवे फीचर्स आणतं. टेक्स्ट फीचर आणि इमोजी अपडेटनंतर व्हॉट्सअॅप आता मंद प्रकाशात उत्तम फोटोसाठी नाईट मोड फीचर आणणार आहे.


व्हॉट्सअॅपचं नाईट फीचर इतर अॅपच्या नाईट मोडप्रमाणे समजू नका. दुसऱ्या अॅपमध्ये UI डार्क केलं जातं, जेणेकरुन युझरच्या डोळ्यांवरील तणाव कमी होईल. तर व्हॉट्सअॅपचं नाईट फीचर त्याच्या कॅमेरा फीचरमध्ये स्पष्टता आणतं. या फीचरद्वारे कमी प्रकाशातही युझर चांगेल फोटो क्लिक करु शकतील. या नव्या अपडेटसह व्हॉट्सअॅपच्या कॅमेरा UIमध्ये नवं बटण अॅड होईल. या बटण किंवा फीचरमध्ये कमी प्रकाशात काढलेल्या फोटोंची क्वालिटी आणखी चांगली करण्याची क्षमता असेल. हे नवं फीचर आधी आयओएसमध्ये येईल.अँड्रॉईड युझरना या फीचरसाठी थोडी वाट पाहावी लागेल. हे फीचर किती दिवसात युझरसाठी उपलब्ध होईल, याबाब अद्याप कोणतीही अधिकृत माहिती मिळालेली नाही.