शनिवार, 30 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. ऑटोमोबाइल
  3. आयटीच्या जगात
Written By
Last Modified: बुधवार, 14 जुलै 2021 (20:23 IST)

मास्टरकार्डवरील RBIची नेटवर्कमध्ये नवीन ग्राहक जोडण्यावर बंदी

केंद्रीय रिझर्व्ह बँकेने मास्टरकार्ड एशिया / पॅसिफिक प्रायव्हेट लिमिटेड (मास्टरकार्ड) वर मोठी कारवाई केली आहे. 22 जुलैपासून आरबीआयने कंपनीला आपल्या कार्ड नेटवर्कवर नवीन घरगुती डेबिट, क्रेडिट किंवा प्रीपेड ग्राहक जोडण्यास मनाई केली आहे. याचा अर्थ 22 जुलैपासून कंपनी आपल्या कार्ड नेटवर्कमध्ये नवीन ग्राहक समाविष्ट करू शकणार नाही.
 
RBI ने दिलेल्या माहितीनुसार आम्ही मास्टरकार्ड कंपनीला पुरेसा वेळ दिला होता. तसंच विविध प्रकारे पर्यायही उपलब्ध करून दिले होते. तरीही पेमेंट सिस्टिम डेटा स्टोरेज्या निर्देशांचं पालन कंपनीने केलं नाही. त्यामुळे आम्हाला ही कारवाई करावी लागली आहे. एप्रिल महिन्यात RBI ने अमेरिकन एक्स्प्रेस बँकिंग कॉर्प आणि डिनर्स क्लब इंटरनॅशनल लिमिटेडवर डेटा स्टोअरजेच नियमाचं उल्लंघन केल्याप्रकरणी कारवाई केली होती. RBI ने आज दिलेल्या आदेशाचा परिणाम मास्टरकार्डच्या सध्याच्या ग्राहकांवर होणार नाही.
 
भारतीय बँकांनी जारी केलेली सर्व डेबिट आणि क्रेडिट कार्ड्समध्येदेखील मास्टरकार्ड आहे. या नेटवर्कची कार्डे खरेदीसाठी, एटीएममधून पैसे काढण्यासाठी, ऑनलाइन पेमेंट करण्यासाठी आणि इतर आर्थिक हेतूंसाठी वापरली जातात.