शनिवार, 23 नोव्हेंबर 2024
  1. धर्म
  2. हिंदू
  3. हिंदू धर्माविषयी
Written By

संकष्टी चतुर्थीला ही 9 कामे निषिद्ध

प्रत्येक महिन्यात दोन चतुर्थी असतात.अशाप्रकारे 24 चतुर्थी आहेत आणि दर तीन वर्षांनी अधिकमासाची मोजून 26 चतुर्थी आहेत. प्रत्येक चतुर्थीचे वैभव आणि महत्त्व वेगळे असते. चतुर्थीच्या दिवशी काही निषिद्ध क्रिया असतात.
 
जाणून घ्या कोणते असे कार्य आहेत जी चतुर्थी तिथीला करणे टाळावे-
 
1. हिंदू पंचांगानुसार शुक्ल पक्षातील चतुर्थीला विनायक चतुर्थी म्हणतात आणि पक्षातील चतुर्थीला संकष्टी चतुर्थी म्हणतात.
2. चतुर्थी तिथीची दिशा नैऋत्य आहे. चतुर्थी रिक्त तिथी आहे. म्हणून या दिवशी शुभ व मांगलिक कार्य वर्जित असतात.
3. चतुर्थी गुरुवार असल्यास मृत्युदा असते आणि शनिवार असल्यास सिद्धिदा असते. चतुर्थीच्या रिक्त असण्याचा दोष विशेष परिस्थितीत नाहीसा होतो.
4. गणपतीला चतुर्थीच नव्हे तर कोणत्याही दिवशी तुळस अर्पित करु नये.
5. या दिवशी कांदा, लसूण, मद्य आणि मांस याचे सेवन करु नये.
6. गणपतीच्या या पवित्र दिवशी शारीरिक संबंध ठेवणे वर्जित मानले गेले आहे.
7. चतुर्थीला कोणत्याही पशू किंवा पक्ष्यांना छळू नये. तसे, हे कोणत्याही दिवशी केले जाऊ नये.
8. या दिवशी वृद्धांचा किंवा ब्राह्मणांचा अपमान करू नये. तसे, हे कोणत्याही दिवशी केले जाऊ नये.
9. चतुर्थीच्या दिवशी खोटे बोलण्यामुळे नोकरी व व्यवसायात तोटा होतो.