शुक्रवार, 19 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. ऑटोमोबाइल
  3. आयटीच्या जगात
Written By
Last Modified: गुरूवार, 21 जानेवारी 2021 (15:22 IST)

Telegram चे आधुनिक फीचर्स करतात व्हॉट्सअॅपला मात

टेलिग्राम अॅपमध्ये अनेक आधुनिक फीचर्स आहे जे आपल्याला व्हाट्सअप किंवा सिग्नल ॲप्स मध्ये आढळत नाही. हे फीचर्स व्हिडिओ एडिटिंग, सेट रिमाइंडर, पोल आणि स्लो मोड या सारखे आहे. आज आम्ही आपल्याला टेलिग्रामचे चार आधुनिक फिचर्स बद्दल सांगणार आहोत.
 
व्हिडिओ एडिटिंग
टेलिग्राम युजर्स फोटो किंवा व्हिडिओ पाठवण्यापूर्वी त्याला संपादित करु शकता. हे बेसिक फीचर नसून यात फुल फ्लेज एडिटिंग टूल आहे ज्याद्वारे युजर आरजीबी कर्व फीचर वापरुन कलर करेक्शन करु शकतात. ऐवढेच नव्हे तर यात एलिमेंट एडजेस्टमेंट देखील करता येतं. हे फीचर वापरण्यासाठी आधी एखादा व्हिडिओ सिलेक्ट करावा लागतो ज्यानंतर सर्व फीचर्स दिसू लागतात.
 
सेट रिमाइंर
टेलिग्राम संदेश जतन करण्यासाठी उपयोगी आहे. या फीचरच्या मदतीने यूजर्स आपला आवश्यक डेटा जसे फोटो, डॉक्यूमेंट्स आणि ऑडियो जतन करु शकतात. हे सर्व अॅपच्या क्लाउडवर जतन होतं. नंतर आपण कोणत्याही डिव्हाइसद्वारे लॉगइन करुन आपला डेटा वापरु शकतात. सेव मेसेजवर रिमाइंडर देखील सेट करता येतं.
 
स्लो मोड
या अॅपमध्ये स्लो मोड सिलेक्ट केल्याने यूजर निश्चित वेळात केवळ एक संदेश पाठवू शकतात. अर्थात स्लो मोड यात तीस सेकंद असा वेळ सेट केल्यास एक यूजर 30 सेकंदात केवळ एकच मेसेज पाठवू शकेल. हे या अॅपची गरज असल्यामागील कारण म्हणजे टेलिग्रामच्या एका ग्रुपमध्ये दो लाख लोकं सामील होऊ शकता. अशात मेसेज फ्रीक्वेंसी वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही.
 
पोल
एखाद्या मुद्दयावर प्रत्येकाचे मत जाणून घेण्यासाठी पोल पाठवता येऊ शकतं. हे ट्विटर पोल प्रमाणे कार्य करतं. यासाठी ग्रुप अॅडमिनला पोल ऑयकनवर क्लिक करावं लागेल.