मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. ऑटोमोबाइल
  3. आयटीच्या जगात
Written By
Last Modified: शनिवार, 30 मे 2020 (11:27 IST)

Mitron अ‍ॅप आमच्याकडून केवळ अडीच हजारांना घेतलं विकत; पाकिस्तानी कंपनीचा दावा

टिक-टॉकवरील वादग्रस्त व्हिडिओंमुळे आता लोक भारतीय अॅप मित्रो (Mitron) कडे वळत आहे. एक आठवड्यातच लाखो लोकांनी या अॅपला डाउनलोड केले असून याची रेटिंग टिकटॉकपेक्षा अधिक असल्याची चित्र आहे. याचे फीचर्स टिक-टॉकप्रमाणेच आहे. मात्र आता मित्रो हे अ‍ॅप चक्क पाकिस्तानी कंपनीचे असल्याचा दावा एका पाकिस्तानी सॉफ्टवेअर कंपनीने केला आहे.
 
पाकिस्तानमधील सॉफ्टवेअर डेव्हलपर कंपनी Qboxus ने दिलेल्या माहितीनुसार कंपनीने या अ‍ॅपचा सोर्सकोड दोन हजार ६०० रुपयांना (३४ डॉलरला) विकत घेतलं आहे. या कोडच्या आधारे संपूर्ण प्रॉडक्ट निर्माण केला जाईल असं वाटत असताना सोर्सकोड विकत घेणाऱ्या मित्रोच्या सध्याच्या टीमने आमचाच संपूर्ण कोड वापरला मात्र लोगो आणि नाव बदलून तो त्यांच्या स्टोअर्सवर अपलोड केला. या अ‍ॅपबद्दल नेटवर्क १८ ने एक खुलासा केला आहे. 
 
हे अ‍ॅप हे रूरकी येथील ‘इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी’च्या विद्यार्थ्यांनी बनवल्याचे सांगण्यात येत होते. मात्र यामागील सत्य वेगळंच असल्याची माहिती आता या अ‍ॅपचा सोर्सकोड बनवून तो भारतीय डेव्हपर्सला विकणाऱ्या क्यूबॉक्सअसने केला आहे.
 
दावा केला जात आहे की या अ‍ॅपचे सर्व फीचर्स, इंटरफेस आणि इतर गोष्टी या पाकिस्तानमधील सॉफ्टवेअर डेव्हलपर कंपनी असणाऱ्या क्यूबॉक्सअसचे आहेत.