शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. ऑटोमोबाइल
  3. आयटीच्या जगात
Written By
Last Modified: गुरूवार, 31 ऑक्टोबर 2019 (12:54 IST)

राजकीय जाहिरातींना ट्विटरवर बंदी

सोशल मीडियावरील ट्विटरनं आता राजकीय जाहिरातींना बंदी घातली आहे. या बंदीनंतर आता ट्विटरवर राजकीय जाहिराती दिसणार नाहीत. जगभरात घालण्यात आलेल्या या बंदीवर 22 नोव्हेंबरपासून अंमलबजावणी करण्यात येणार आहे. 
 
ट्विटरचे सीईओ जॅक पॅट्रिक डॉर्सी यांनी ट्विट करून यासंदर्भात माहिती देत हा निर्णय का घेतला याची कारणे देखील सांगितली आहे. त्यांनी ट्विट केले की 'आम्ही जागतिक स्तरावर ट्विटरवर सर्व राजकीय जाहिरातींवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. राजकीय संदेश पोहोचला पाहिजे, मात्र तो खरेदी केला जाऊ नये असं आम्हाला वाटतं. का? काही कारणे'.
 
जाणून घ्या कारणं
 
एका राजकीय मेसेजला लोक अकाउंटला फॉलो करतात किंवा मेसेज रिट्विट करतात तेव्हा रीच मिळतो. जाहिरातींच्या माध्यमातून लोकांपर्यंत ठराविक राजकीय मेसेज पोहोचवला जातो. त्यामुळं या निर्णयाची पैशासोबत तडजोड केली जाऊ नये, असं आम्हाला वाटतं.
 
व्यावसायिक जाहिरातदारांसाठी इंटरनेट अॅडव्हर्टायझिंग खूप प्रभावशाली असलं तरी ती ताकद राजकारणात जोखीम घेणारी असते. हा माध्यम मतदारांना प्रभावित करण्यासाठी केला जाण्यामुळे याने लाखो लोकांचं आयुष्य प्रभावित होतं.
 
मशीन लर्निंग आधारित मेसेजचे ऑप्टिमायझेशन आणि मायक्रो-टार्गेटिंग बोगस सूचनांना अनियंत्रित करते.
 
सुरुवातीला केवळ उमेदवारांच्या जाहिरातींवर बंद घालण्याचे ठरवले होते. मात्र आता मुद्द्यांशी संबंधित जाहिरातींवरही बंदी घालण्यात येत आहे.
 
राजकीय जाहिरांतींविना मोठी आंदोलने यशस्वी झाल्याचं आम्ही बघितलं असून पुढेही तेच होईल असा आमचा विश्वास आहे.
 
अंतिम धोरण 15 नोव्हेंबरपर्यंत जाहीर केलं जाईल. नवीन धोरण 22 नोव्हेंबरपर्यंत लागू होईल.