शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019
Written By

#SharadPawar हा हॅशटॅग ट्विटवर पहिल्या क्रमांकावर ट्रेण्ड

राष्ट्रवादीचे अध्यक्ष  सर्वेसर्वा शरद पवार यांची सभा सुरु असताना मुसळधार पाऊस कोसळू लागला पण पवार थांबले नाही आणि त्यांनी आपले भाषण सुरुच ठेवले. पवारांचा भर पावसात भाषण देतानाचे फोटो आणि व्हिडिओ सोशल नेटवर्किंगवर व्हायरल झाले आहेत. शनिवारी सकाळपासूनच #SharadPawar हा हॅशटॅग ट्विटवर पहिल्या क्रमांकावर ट्रेण्ड होताना दिसला.
 
 आता शरद पवार यांच्या कन्या आणि राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी या सभेबद्दल आपले मत व्यक्त केले आहे. सुप्रिया यांनी ट्विट करुन या सभेतील पवारांचा फोटो शेअर करत आपले मत व्यक्त केलं आहे. या सभेमुळे सर्वांनाच नवी उर्जा मिळाली आहे असं मत त्यांनी व्यक्त केलं आहे. “साताऱ्याच्या मातीनं आज पुन्हा इतिहास घडविला. तुफान पावसातही माणसांनी तुडूंब भरलेलं मैदान आदरणीय शरद पवार साहेबांना ऐकत होतं. ‘वारं फिरलंय, इतिहास घडणार’, हा संदेश देणाऱ्या या सभेनं राष्ट्रवादीच्या सर्वांनाच नवी उर्जा मिळाली,” असं ट्विट सुप्रिया यांनी केले आहे.