बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. ऑटोमोबाइल
  3. आयटीच्या जगात
Written By
Last Modified: गुरूवार, 2 जुलै 2020 (08:30 IST)

WhatsApp ची अ‍ॅनिमेटेड स्टिकर्स फीचर युजर्ससाठी रोलआउट

फेसबुकची मालकी असलेल्या WhatsApp ची अ‍ॅनिमेटेड स्टिकर्स या हे फीचर कंपनीने युजर्ससाठी रोलआउट करण्यास सुरूवात केल्याची माहिती आहे. WABetaInfo च्या रिपोर्टनुसार, नवीन फीचर अँड्रॉइड आणि आयओएसच्या beta व्हर्जनच्या युजर्ससाठी रोलआउट करण्यास कंपनीने सुरूवात केली आहे.
 
कंपनीने अँड्रॉइड आणि आयओएस बीटा अ‍ॅप युजर्ससाठी Playful Piyomaru नावाचे पहिले अ‍ॅनिमिटेड स्टिकर पॅकही रिलीज केले आहे. 2.8 MB इतक्या साइजचे हे पहिले अ‍ॅनिमिटेड स्टिकर पॅक आहे. अँड्रॉइड बीटा अ‍ॅप युजर्स व्हर्जन 2.20.195.1 ला रोलआऊट करुन नवीन फीचरचा वापर करु शकतील. तर आयफोन बीटा अ‍ॅप युजर्सना हे फीचर वापरण्यासाठी बीटा व्हर्जन 2.20.70.26 डाउनलोड करावे लागेल. लवकरच हे फीचर कंपनी सर्व युजर्ससाठी रोलआउट करण्याची शक्यता आहे.