1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. व्हॉट्सअप मॅसेजेस
Written By
Last Modified: मंगळवार, 30 जून 2020 (13:36 IST)

आत्मनिर्भर आजी....

aatmanirbhar joke
आजींनी हॉस्पिटलमध्ये फोन केला आणि म्हणाल्या: 
मला रूम नंबर 302 मधल्या निर्मला यांची तब्येत कशी आहे ते कळू शकेल का.. 
जरा काळजी वाटतीये म्हणून फोन केला..
जरा दोन मिनिटं होल्ड करा हं' असं म्हणत तिथल्या ऑपरेटरनी तिसऱ्या मजल्यावरच्या नर्सशी फोन जोडून दिला.
नर्स म्हणाली - बऱ्या आहेत त्या आता. बीपी पण नॉर्मल झालंय आणि सगळ्या टेस्ट्स पण नॉर्मल आल्यात. डॉक्टर म्हणतायत उद्या सोडतील घरी त्यांना.
वा वा! खूप बरं वाटलं ऐकून ! धन्यवाद!" - आजी म्हणाल्या.
नर्स : तुम्ही त्यांची बहीण बोलताय का?
नाही, मी स्वतः निर्मला बोलतीये 302 मधून !
मला कोणीच काही धड सांगेना, म्हणून म्हंटल स्वतःच चौकशी करावी !!