गुरूवार, 9 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. आयटी
  3. आयटीच्या जगात
Written By

WhatsApp यूजर्स आता प्रोफाइल फोटो डाऊनलोड करू शकणार नाही

सर्वांच्या जीवनातील अभिन्न भाग झालेले व्हॉट्सअॅप वापरणे सुरक्षेच्या दृष्टीने कधीकधी महागत पडतं. तरी कंपनी आपल्या यूजर्सच्या सुरक्षितेसाठी नवीन फीचर लॉन्च करत असते. त्यात भरत घालत आता एका नवीन फीचरप्रमाणेच यूजर्स प्रोफाइल फोटो डाउनलोड करू शकणार नाही.
 
व्हॉट्सअ‍ॅप लवकरच जतन केलेले असो वा नाही अश्या संपर्कांचे प्रोफाइल फोटो डाऊनलोड करण्याचा पर्याय हटवणार आहे.
 
व्हॉट्सअ‍ॅपमध्ये प्रोफाइल फोटो जतन करण्याची सुविधा होती मात्र आता सुरक्षितेसाठी हे सोय काढण्यात येईल. व्हॉट्सअ‍ॅपने कॉन्टॅक्ट्सचे प्रोफाइल फोटो कॉपी किंवा शेअर करणे प्रतिबंधित केले आहे. पण ग्रुपचे फोटो डाऊनलोड किंवा शेअर करता येतील.
 
WhatsApp अल्बम ले-आऊट आणि ऑडिओ फॉरमॅटमध्ये बदल करणारे फीचर आणणार आहे. WhatsApp च्या नव्या iOS बीटा व्हर्जनमध्ये चॅटमध्ये दिसणारा इमेज अल्बम अधिक चांगला दिसेल. तसेच अधिक प्रमाणात फोटो असल्यास त्याचा अल्बम तयार होऊन तो डाऊनलोड करणे शक्य होईल. अल्बममधील फोटोंची संख्या ही दिसेल. 
 
तसेच व्हॉट्सअ‍ॅपवरील ऑडिओसाठी वापरण्यात येणारं opus फॉरमेट बदलून त्याजागी M4A फॉरमॅट वापरण्यात येईल. यासह अनेक लहान-सहान बदल करण्यात येत आहे.