शुक्रवार, 8 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. आयटी
  3. आयटीच्या जगात
Written By
Last Modified: गुरूवार, 28 मार्च 2019 (15:57 IST)

व्हाट्सअॅपवर लवकरच डार्क मोड दिसेल

इन्स्टंट मेसेजिंग अॅप व्हाट्सअॅप लवकरच अँड्रॉइड वापरकर्त्यांसाठी डार्क मोड फीचर लॉन्च करणार आहे. दीर्घ काळापासून वापरकर्ते याची वाट पाहात होते. बीटा व्हर्जनमध्ये व्हाट्सअॅपवर डार्क मोडची तपासणी पाहिली गेली आहे. हे फीचर सध्या सर्व वापरकर्त्यांसाठी उपलब्ध नाही आणि वापरकर्ते ते स्वतः सेट करण्यास सक्षम असतील. आधी फक्त डार्क मोड फीचरची माहिती मिळाली होती पण आता नवीन माहितीनुसार अशी अपेक्षा आहे की हे फीचर लवकरच लॉन्च होईल. तथापि, कंपनीने सध्या लॉन्चिगची तारखेची घोषणा केलेले नाही.
 
* डार्क नव्हे तर ग्रे आहे व्हाट्सअॅपचा डार्क मोड - व्हाट्सअॅपचा डार्क मोड फीचर इतर अॅप्स प्रमाणे पूर्णपणे ब्लॅक नसून ग्रे रंगात उपलब्ध आहे. व्हाट्सएप डार्क मोड फीचर 2.19.82 व्हर्जनमध्ये पाहिले गेले आहे. व्हाट्सअॅपचा हा फीचर टेस्टिंग स्टेजमध्ये सध्या केवळ सेटिंग्जमध्ये उपलब्ध आहे. पण लवकरच व्हाट्सअॅप या फीचरची टेस्टिंग पूर्ण करेल. अँड्रॉइड डार्क मोडची तुलना आयओएस डार्क मोडशी कराल तर हे ओएलईडी फ्रेंडली नाही.