शुक्रवार, 29 मार्च 2024
  1. मराठी बातम्या
  2. आयटी
  3. आयटीच्या जगात
Written By
Last Modified: शनिवार, 18 मे 2019 (16:37 IST)

Tata Sky Binge लॉन्च, सेट टॉप बॉक्स शिवाय 249 रुपयांत पाहु शकता चॅनल्स

Tata Sky ने आपली नवीन सर्व्हीज Tata Sky Binge लॉन्च केली आहे, कंटेंट आधारित सर्व्हिसमध्ये Amazon Fire TV Stick द्वारे वापरता येईल.
 
Tata Sky Binge च्या या सेवेचा वापर करण्यासाठी Amazon Fire TV Stick आणि Tata Sky चा एडिशन विकत घ्यावा लागेल. या सेवेसाठी ग्राहकांना 249 रुपये भरावे लागतील. Tata Sky Binge सेवेचा वापर करण्यासाठी अमेझॅनचा फायर स्टिक आपल्या टीव्हीमध्ये स्थापित करणे आवश्यक आहे. जर आपल्या टीव्हीमध्ये एचडीएमआय (HDMI) पोर्ट असेल तर आपण हे वापरू शकता. टाटा स्काय बिन्ज वापरून आपण हॉटस्टार, इरोज नाऊ, सन नेक्स्ट, हंगामा इतर व्हिडीयो कंटेंट पाहु शकता आणि त्यांच्या सेवा वापरू शकता. हे सर्व अॅप्स एकाच सब्सक्रिप्शनमधून उपलब्ध होतील ज्यासाठी आपल्याला रुपये 249 भरावे लागतील.
 
ग्राहकांना आपलं टाटा स्काय कंटेंट पाहण्यासाठी सेट टॉप बॉक्स काढावा लागणार नाही. कंपनीनुसार यात 100,000 तास ऐवढे कंटेंट उपलब्ध आहे. यात बॉलीवूड, हॉलीवूड आणि प्रादेशिक भाषांचे चित्रपट पाहु शकता. याशिवाय, टीव्ही कार्यक्रम, शो आणि मुलांचे शो देखील पाहु शकता. Tata Sky Binge अॅपमध्ये जाऊन Amazon Fire TV Stick अॅक्टिवेट करावे लागेल. 
 
* सर्व प्रथम टीव्हीच्या एचडीएमआय पोर्टमध्ये अॅमेझॉन फायर स्टिक-टाटा स्काय व्हर्जन लावावा. 
* टीव्ही स्क्रीनवर अॅमेझॉन फायर स्टिकला जोडावं लागेल आणि यासाठी वाय-फायची गरज राहील. वाय-फाय ने फायर स्टिक कनेक्ट करावी लागेल. 
* आपल्या अमेझॅन खात्यात लॉगइन करा.
* आपला Tata Sky Binge पॅक अॅक्टिवेट करा. लॉग इन केल्यानंतर सर्व कंटेंत आपोआप डाउनलोड होईल.