शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. खेळ मराठी
  3. प्रो कबड्डी 2021
Written By
Last Modified: शुक्रवार, 31 डिसेंबर 2021 (20:25 IST)

Pro Kabaddi League 2021 तमिल थलायवास vs पुणेरी पलटण

प्रो कबड्डी लीगमध्ये आज तमिल थलायवासचा सामना पुणेरी पलटणशी होणार आहे. मात्र, दोन्ही संघातील काही निवडक खेळाडू सातत्याने चांगली कामगिरी करत आहेत. प्रो कबड्डी लीग सीझन-8 च्या 23 व्या सामन्यात, तमिल थलायवास पुणेरी पलटनचा सामना करेल. दोन्ही संघांना आतापर्यंत विशेष काही दाखवता आलेले नाही. तमिल थलायवास लीगमध्ये 10व्या आणि पुणेरी पलटन 12व्या स्थानावर आहे. मात्र, दोन्ही संघातील काही निवडक खेळाडू सातत्याने चांगली कामगिरी करत आहेत. 
तमिल थलायवासचे 2 सामने बरोबरीत असून एकात संघाचा पराभव झाला आहे. कर्णधार सुरजित सिंगने या 3 सामन्यांमध्ये 10 यशस्वी टॅकल केले आहेत. पुण्याच्या रेडर्ससमोर त्याचे सर्वात मोठे आव्हान असेल. मनजीत सातत्याने तमिल थलायवाससाठी रेड पॉईंट्स  घेत आहे. या मोसमात त्याने 20 यशस्वी रेड पॉईंट्स केले आहेत. आज या दोन खेळाडूंच्या सहाय्याने थलायवा आपल्या पहिल्या विजयाचा शोध संपवण्यास उतरतील.
 
दोन्ही संघ असे आहेत -
 
तमिल थलायवास
रेडर्स: के प्रपंजन, मनजीत , अतुल एमएस, भवानी राजपूत, 
अष्टपैलू: अनवर साहीद बाबा, सौरभ तानाजी (सौरभ तानाजी पाटील), सागर बी कृष्णा, संथापनसेल्वम
बचावपटू: सागर, हिमांशु, एम. अभिषेक, मोहम्मद तुहिन तरफदर, सुरजीत सिंग , मोहम्मद तुहीन तरफडे, सुरजित सिंग, साहिल 
 
पुणेरी पलटण (Puneri Paltan)
रेडर्स : पवन कुमार कादियन, पंकज मोहिते, मोहित गोयत, राहुल चौधरी, नितीन तोमर, विश्वास 
अष्टपैलू: गोविंद गुर्जर, व्हिक्टर ओनयांगो ओबिएरो, ई सुभाष
बचावपटू: बाळासाहेब शहाजी जाधव, हाडी ताजी , संकेत सावंत, विशाल भारद्वाज, बलदेव सिंग , सोमबीर, करमवीर, अबिनेश नादरजन, सौरव कुमार