ठाकरे घराण्यातील ही व्यक्ति होऊ शकते उपमुख्यमंत्री

Aditya Thackeray
Last Modified सोमवार, 27 मे 2019 (17:32 IST)
लोकसभा निकालानंतर देशासह राज्यभरात राजकीय पक्षांच्या रणनीती आखण्यासाठी बैठकांचं सत्र असून, राज्यात मुख्य पक्ष असलेया शिवसेनेच्या पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावली आहे. सोबतच सक्रीय राजकारणात काम करणारे बाळासाहेब ठाकरे यांचे नातू युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनीही त्यांच्या युवासेनेच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेणार आहेत. आज युवासेनेची शिवसेना भवनात बैठक होत आहे. यामध्ये पुढे चिऊ घातलेल्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या तयारीसाठी ही बैठक असणार आहे. मात्र आता ठाकरे घराण्यातील व्यक्ती स्वतः निवणूक लढवणार का यावर जोरदार चर्चा सुरु झाली आहे. या बैठकीत आदित्य ठाकरे विधानसभा निवडणूक लढवण्याबाबतची घोषणा करणार का याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. सोबतच आदित्य ठाकरे यांनी निवडणूक लढावी या करिता शिवसेना पक्षासह, भाजपातील केंद्रीय पक्षश्रेठी आग्रही आहेत.

आज सायंकाळी 5 वाजता शिवसेना नेत्यांची बैठक होणार आहे. उद्धव ठाकरे यांनी ही बैठक बोलावली असून,‘मातोश्री’वर ही बैठक होणार आहे. या बैठकीत राज्य मंत्रिमंडळ विस्तार, उपमुख्यमंत्री पदावर चर्चा होण्याची दाट शक्यता असून, शिवसेनेला उपमुख्यमंत्रीपद वाट्याला आले तर आदित्य ठाकरे यांचं नाव त्या पदासाठी शिवसेनेकडून देण्यात येईल अशी चर्चा आहे. अश्यापरिस्थितीत व पदाधिकारी, जेष्ठ नेत्यांच्या मागणी नुसार आदित्य ठाकरे निवडणुकीच्या रिंगणात उतरणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. त्यामुळे जर आदित्य यांनी निवडणुकीचा विचार जर केला तर ठाकरे घराण्यातील पहिल्या व्यक्ती ठरतील की ज्या एखाद्या पदावर विराजमान होणार आहेत. बाळासाहेब ठाकरे यांनी कधीही निवडणूक लढवली नाही सोबतच त्यांनी कधीही कोणत्याही पदाचा मोह देखील धरला नाही.


यावर अधिक वाचा :

Corona virus ची भीती, काय प्रत्येकाला मास्क लावणे आवश्यक, ...

Corona virus ची भीती, काय प्रत्येकाला मास्क लावणे आवश्यक, आरोग्य मंत्रालयाने जारी केले निर्देश
भारतात कोरोना व्हायरसच्या रुग्णांची संख्या वाढत असून केंद्र सरकारने यासाठी तयारी केलेली ...

महाराष्ट्रात कोरोनाचा पहिला बळी

महाराष्ट्रात कोरोनाचा पहिला बळी
देशभरात करोना व्हायरसमुळे काळजीचं वातरवारण पसरलं असताना महाराष्ट्रात या आजरामुळे पहिल्या ...

राज्यात कोरोना रुग्ण संख्या ३९, १०८ लोक विलगिकरण कक्षात

राज्यात कोरोना रुग्ण संख्या ३९, १०८ लोक विलगिकरण कक्षात
राज्यात यवतमाळ येथे १ आणि नवी मुंबई येथे १ असे २ कोरोना रुग्ण आढळून आले. यामुळे राज्यातील ...

कोरोना रोखण्यासाठी राज्य सरकारचे 11 मोठे निर्णय माहीत हवेत

कोरोना रोखण्यासाठी राज्य सरकारचे 11 मोठे निर्णय  माहीत हवेत
– राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तीन महिने पुढे ढकलल्या. – ग्रामीण ...

पुणे : दुकाने 3 दिवस बंद

पुणे : दुकाने 3 दिवस बंद
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुण्यातली दुकानं पुढील तीन दिवस बंद राहणार आहेत. कोरोनाचा फैलाव ...

काही कट्टरपंथी मुस्लिमांकडूनच PM मोदींच्या लॉकडाऊनला विरोध ...

काही कट्टरपंथी मुस्लिमांकडूनच PM मोदींच्या लॉकडाऊनला विरोध : रिझवी
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने भारतीयांच्या भल्यासाठी लॉकडाउनसारखा मोठा निर्णय ...

करोना पार्श्वभूमीवर सर्वच ठिकाणी शिवभोजन योजना सुरु करा

करोना पार्श्वभूमीवर सर्वच ठिकाणी शिवभोजन योजना सुरु करा
कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर गोरगरीब जनता ...

दिल्लीच्या निजामुद्दीन येथील ‘त्या’ कार्यक्रमास ...

दिल्लीच्या निजामुद्दीन येथील ‘त्या’ कार्यक्रमास महाराष्ट्रातीलपुणे येथे 136 जणांची ‘हजेरी’
दोन आठवड्यापूर्वी राजधानी दिल्लीत झालेल्या धार्मिक संमेलनात सहभागी झालेल्या दोन ...

नक्की वाचा कोरोनालाही हरवता येतं… नागपुरातील कोरोना ...

नक्की वाचा कोरोनालाही हरवता येतं… नागपुरातील कोरोना बाधिताचा स्वानुभव!
माहिती तंत्रज्ञान उद्योगात नोकरीला असल्यामुळे एका राष्ट्रीय परिषदेसाठी आम्ही 8 सहकारी ...

वोडका प्या, हॉकी खेळा आणि कोरोना पळवा...!

वोडका प्या, हॉकी खेळा आणि कोरोना पळवा...!
कोरोनाचा संसर्ग होऊ नये यासाठी बेलारूसचे राष्ट्राध्यक्ष अलेक्झांडर लुकाशेनको यांनी ...