शनिवार, 28 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. लोकसभा निवडणूक 2019
  3. लोकसभा निवडणूक 2019 बातम्या
Written By
Last Modified: गुरूवार, 23 मे 2019 (07:53 IST)

धनंजय मुंडे यांनी १८ किलो वजन कमी केले

विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी मागील काही महिन्यात आपले शारीरिक वजन प्रचंड कमी केलं आहे. मागील साडेपाच महिन्यात त्यांनी आपलं वजन १८ किलोंनी कमी केलं आहे. डिसेंबर २०१८ मध्ये धनंजय मुंडे यांचं वजन ९५ किलो होतं. हे वाढतं वजन प्रकृतीसाठी त्रासदायक असल्याचं लक्षात आल्याने त्यांनी वजन कमी करायला सुरुवात केली आणि डिसेंबरमध्ये ९५ किलो असलेलं वजन १८ किलोंनी कमी करून ७७ किलोंवर आणलं आहे. नियमित व्यायम आणि योग्य डायट करून त्यांनी हे वजन कमी केलं आहे.
 
राजकीय जीवनात तणाव, धावपळ, दगदग, जेवणाच्या अनियमित वेळा, चहा पिण्याचे वाढलेलं प्रमाण याचा परिणाम शरीरावर होत असल्याचं धनंजय मुंडेंच्या लक्षात आलं. यातूनच वजन कमी करण्याचा पण त्यांनी केला. त्यासाठी तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेतलं. यातून त्यांनी व्यायाम आणि डायटचा आपल्या दिनक्रमात समावेश केला.