शनिवार, 27 सप्टेंबर 2025
  1. मराठी बातम्या
  2. लोकसभा निवडणूक 2019
  3. लोकसभा निवडणूक 2019 बातम्या
Written By
Last Modified: बुधवार, 22 मे 2019 (17:32 IST)

जयदत्त क्षीरसागर शिवबंधनात अडकणार

Jaydatta Kshirsagar will be involved in the Shiva Sena
राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जयदत्त क्षीरसागर यांनी बुधवारी अधिकृतरित्या विधानसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. क्षीरसागर यांनी मुंबईत विधानसभेचे अधयक्ष हरिभाऊ बागडे यांची भेट घेऊन अधिकृतरित्या त्यांच्याकडे राजीनामा सुपूर्द केला आहे. जयदत्त क्षीरसागर संध्याकाळी शिवसेना पक्षात प्रवेश करणार आहेत. शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थित क्षीरसागर शिवसेना भवन येथे पक्ष प्रवेश करणार आहेत.
 
गेल्या महिन्यात क्षीरसागर आणि शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यात बैठक झाली होती. ही बैठक उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री निवासस्थानावर झाली होती. या बैठकीला बीडचे नगराध्यक्ष डॉ. भारतभूषण क्षीरसागर आणि डॉ. योगेश क्षीरसागर उपस्थित होते.