शुक्रवार, 3 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. लोकसभा निवडणूक 2019
  3. लोकसभा निवडणूक 2019 बातम्या
Written By
Last Modified: बुधवार, 3 एप्रिल 2019 (09:32 IST)

हार्दिक पटेल यांना सर्वोच्च न्यायालयाचा झटका

मेहसानामध्ये झालेल्या हिंसाचार प्रकरणात काँग्रेस नेते हार्दिक पटेल यांना सर्वोच्च न्यायालयानेही झटका दिला. सर्वोच्च न्यायालयाने याप्रकरणी त्वरित सुनावणीस नकार दिला. त्यांच्या याचिकेवर सुनावणी ४ एप्रिलला होणार आहे. हार्दिक पटेल जामनगर लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढविण्यास इच्छुक आहेत.
 
हार्दिक यांनी गुजरात उच्च न्यायालयाच्या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयात अपील केले होते. मात्र, तिथे त्यांना दिलासा मिळाला नव्हता. हार्दिक पटेल यांना हिंसाचार प्रकरणात दोन वर्षांची शिक्षा झाली आहे. गुजरात उच्च न्यायालयाने पटेल यांनी शिक्षेतून सुट देण्याची केलेली मागणी फेटाळून लावत निकाल कायम ठेवला होता. त्यामुळे त्यांना लोकप्रतिनीधी कायदा १९५१ अंतर्गत निवडणूक लढवता येत नाही. गुजरात उच्च न्यायालयाच्या निर्णयाविरोधात हार्दिक सर्वोच्च न्यायालयात गेले होते.