रविवार, 12 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. लोकसभा निवडणूक 2019
  3. लोकसभा निवडणूक 2019 बातम्या
Written By
Last Modified: सोमवार, 20 मे 2019 (16:39 IST)

हे तर हवामानाच्या अंदाजासारखे आहे : नाना पटोले

मोदी सरकारच्या कार्यकाळात ज्याप्रमाणे हवामानाचे अंदाज चुकले, तसेच मतदानोत्तर चाचण्यांचे (एक्झिट पोल) आडाखे चुकतील, असे मत काँग्रेसचे उमेदवार नाना पटोले यांनी व्यक्त केले. ते सोमवारी नागपूरमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलत होते. 
 
यावेळी त्यांनी म्हटले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यकाळात हवामान खात्याचे अंदाज अनेकदा चुकले आहेत. त्यामुळे आज महाराष्ट्रात दुष्काळी परिस्थिती असून अर्ध्यापेक्षा जास्त गावात पाण्याची टंचाई निर्माण झाली आहे. हवामान खात्याच्या या अंदाजांप्रमाणेच यंदाच्या लोकसभा निवडणुकीचे एक्झिट पोल चुकतील. एवढेच नव्हे तर काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या नेतृत्त्वाखाली संयुक्त पुरोगामी आघाडीला (यूपीए) सर्वाधिक जागा मिळतील, असा दावाही नाना पटोले यांनी व्यक्त केला.