बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 20 मे 2019 (09:28 IST)

अपघातात चार भाविकांचा जागीच मृत्यू

नाशिकजवळील वणीच्या सप्तश्रृंगीच देवीचं दर्शन घेऊन परतताना रात्रीच्या सुमारास भीषण अपघात झाला आहे. या अपघातात चार भाविकांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर 6 जण गंभीर जखमी आहे. दरम्यान सध्या जखमींवर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरु आहे. या मंदिरात दर्शनासाठी 10 भाविक गेले होते. दर्शन घेऊन परतत असताना रात्री 12.30 च्या सुमारास वणी गावाजवळच टेम्पो आणि ट्रकमध्ये जोरदार धडक झाली. ही धडक इतकी जबरदस्त होती की, टेम्पोमध्ये असलेल्या 4 भाविकांचा जागीच मृत्यू झाला. तर टेम्पोमधील आणखी 6 भाविक जखमी झाले. सध्या वणीजवळील एका रुग्णालयात जखमींवर उपचार सुरु आहे.