बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. लोकसभा निवडणूक 2019
  3. लोकसभा निवडणूक 2019 बातम्या
Written By
Last Modified: बुधवार, 3 एप्रिल 2019 (10:18 IST)

आचारसंहितेचा भंग केल्याबाबत संजय राऊत यांना नोटीस

शिवसेना खासदार संजय राऊत यांना आचारसंहितेचा भंग केल्याबाबत मुंबई जिल्हा निवडणूक आयोगाने नोटीस पाठवली आहे. शिवसेना पक्षाचे मुखपत्र असलेल्या सामना वृत्तपत्रात आक्षेपार्ह मजकूर छापल्याबाबत मुंबई जिल्हा निवडणूक आयोगाने ही नोटीस पाठवली आहे. याबाबत संजय राऊत यांना ३ एप्रिलपर्यंत स्पष्टीकरण देण्याचे निवडणूक आयोगाने आदेश दिले आहेत. 
 
३१ मार्च रोजीच्या सामना वृत्तपत्रात 'रोखठोक' विषयाच्या लेखात ईव्हीएमवर संशय व्यक्त करण्यात आला होता. यावर आक्षेप घेत निवडणूक आयोगाने नोटीस बजावली आहे. आचारसंहिता सुरू असताना वातावरण गढूळ करण्याचा प्रयत्न केल्याचा उल्लेख नोटीसमध्ये करण्यात आला आहे.