1. मराठी बातम्या
  2. लोकसभा निवडणूक 2019
  3. लोकसभा निवडणूक 2019 बातम्या
  4. ram madhav

विरोधकांसाठी २३ मे दुपारी १२ वाजेपर्यंत स्वप्नकाळ

ram madhav
लोकसभा निवडणुकीबाबत आपले एक्झिट पोल खोटे ठरतील याचे दिवास्पप्न ते २३ मे पर्यंत पाहू शकतात, अशा शब्दांत भाजपाचे राष्ट्रीय सरचिटणीस राम माधव यांनी विरोधकांना टोला लगावला आहे. 
 
माधव म्हणाले, २३ मे रोजी दुपारी १२ वाजेपर्यंत विरोधकांसाठी स्वप्नांचा काळ असणार आहे. मात्र, त्यांचे स्वप्न पूर्ण होऊ शकणार नाही. आम्ही नेमक्या निकालाची वाट पाहत आहोत. पण मला विश्वास आहे की, एक्झिट पोल दाखवताहेत त्यापेक्षा आम्हाला अधिक यश मिळेल.लोकसभा निवडणुकीआधी महागठबंधनसाठी अनेक प्रयत्न झाले. त्यानंतर आता मतदानानंतरही असे प्रयत्न होतील मात्र महागठबंधन होऊ शकणार नाही असे त्यांनी सांगितले. 
पुढील लेख
सेन्सेक्समध्ये विक्रमी उसळी, दहा वर्षाच्या तुलनेत सर्वोच्च पातळीवर