1. मराठी बातम्या
  2. लोकसभा निवडणूक 2019
  3. लोकसभा निवडणूक 2019 बातम्या
  4. Vaishali Yedi travels through ST

प्रहारच्या उमेदवार वैशाली येडे यांनी एसटीतून प्रवास करत केला प्रचार

आपल्या भाषणाने मराठी साहित्य संमेलन गाजविणाऱ्या शेतकरी आत्महत्या शेतकऱ्याची पत्नी वैशाली येडे यांनी काही दिवसापूर्वीच लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरला. त्यानंतर त्यांनी आज एसटी बसमधून प्रवास करत प्रचार केला. वैशाली येडे या आमदार बच्चू कडू यांच्या प्रहार संघटनेकडून यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढत आहेत.
 
आमदार बच्चू कडू यांच्या प्रहार संघटनेने सर्वसामान्य कुटुंबातील शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबातील वैशाली येडे यांना उमेदवारी दिली. त्यामुळे यवतमाळ जिल्ह्याच्या राजकारणात वेगळेच वातावरण निर्माण झालं आहे. वैशाली येडे यांचा उमेदवारी अर्ज 25 मार्च रोजी भरण्यात आला. त्यावेळी प्रहार संघटेनेच्या कार्यकर्त्यांनी रक्तादान करुन अनोखा उपक्रम राबवला.त्यानंतर आज वैशाली येडे यांनी त्यांच्या कळंब तालुक्यातील राजुल गावातून एसटी बसने यवतमाळपर्यंत प्रवास केला. एसटी प्रवासादरम्यान त्यांनी सहप्रवाशांकडे मतरुपी पाठिंबा मागितला. सुमारे 35 किमीचा प्रवास त्यांनी एसटीने केला.वैशाली येडे आज आपल्या गाववरुन यवतमाळला उमेदवारी अर्ज छाननी आणि चिन्ह वाटपसाठी आल्या होत्या. त्या एकट्या बसने प्रवास करत होत्या.हल्ली आलिशान मोठ्या गाडीशिवाय कार्यकर्ते सुद्धा प्रचार करत नाहीत. मात्र वैशाली येडे यांनी अशा पद्धतीने केलेला बसप्रवास चर्चेचा विषय बनला आहे. वैशाली येडे यांच्या प्रचारासाठी प्रहार संघटनेकडून झोळी फिरवून लोकवर्गणी गोळा केली जात आहे. आज त्यांच्या या बस प्रवासामुळे त्या आणखी चर्चेत आल्या आहेत.
पुढील लेख
शेतकरी नेते राजू शेट्टी यांची आहे एवढी संपत्ती