गुरूवार, 18 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. लोकसभा निवडणूक 2019
  3. लोकसभा निवडणूक निकाल 2019
Written By
Last Modified: गुरूवार, 23 मे 2019 (08:43 IST)

राज्यातील या चार मतदारसंघाचा निकाल लागणार लवकर

देशभरात लोकसभा निकालाची आतुरतेने वाट सर्व बघत आहेत. तर मतदान मोजणी सुरु झाली आहे. महाराष्ट्रातही 48 लोकसभा मतदारसंघाचा निकाल काय असेल याची सर्वाना उत्सुकता आहे. आज सकाळी 8 वाजता मतमोजणीला सुरुवात झाली आहे. त्यानंतर आता काही वेळातच मतमोजणीचे कल दिसू लागणार आहेत. मात्र  मतदारसंघनिहाय कोणत्या मतदारसंघात कोणता उमेदवार आघाडीवर आहे हेही स्पष्ट होईल, तरीही अंतिम निकाल समजण्यासाठी उशिरापर्यंत सर्वाना वाट पाहावी लागणार आहे. मात्र त्यात राज्यातील 4 मतदारसंघांचा निकाल राज्यातील इतर मतदारसंघांच्या तुलनेत सर्वातागोदर दिसणार आहे. यामध्ये दक्षिण मध्य मुंबई, दक्षिण मुंबई, कल्याण, रत्नागिरी-सिंधुदूर्ग मतदारसंघांमध्ये सर्वात आधी निकाल येईल, कारण म्हणजे, मतदारसंघामधील मतदारांची संख्या, त्याच्या मोजणीसाठी लागणारा वेळ. 
 
दक्षिण मध्य मुंबईत 7 लाख 95 हजार 399 मतमोजणी करावी लागणार, सर्वात आधी दक्षिण मध्य मुंबईचाच निकाल  येईल. नंतर दक्षिण मुंबईत 7 लाख 99 हजार 612 मतमोजणी असीन, दक्षिण मुंबईच्या खालोखाल कल्याण, नंतर रत्नागिरी-सिंधुदूर्गचा क्रमांक असणार आहे. कल्याणमध्ये 8 लाख 88 हजार 183 आणि रत्नागिरी-सिंधुदूर्गमध्ये 8 लाख 97 हजार 249 मतांची मोजणी करणे अपेक्षित आहे.त्यामुळे मुंबईचा निकाल सर्वात आगोदर कळणार आहे.