बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. लोकसभा निवडणूक 2019
  3. लोकसभा निवडणूक निकाल 2019
Written By
Last Updated : सोमवार, 21 ऑक्टोबर 2019 (19:15 IST)

Exit Poll: महाराष्ट्रात पुन्हा भाजप-शिवसेना सरकार

राज्यातील विधानसभेच्या 288 जागांसाठीच्या, तसेच सातारा लोकसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीच्या मतदान संपन्न झाले. विविध पक्षांच्या दिग्गज उमेदवारांचे भविष्य आज ईव्हीएममध्ये बंद झाले आहे. राज्यातील 3237 उमेदवारांचे भवितव्य ठरवणारा दिवस होता आजचा. सकाळी 7 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत मतदान सुरु होतं.
 
2014 च्या विधानसभा निवडणुकीच्या तुलनेत यंदा मतदारांमध्ये मतदानाचा फारसा उत्साह दिसला नाही. त्यातच राज्यात काही ठिकाणी पावसाने हजेरी लावल्याने त्याचाही मतदानावर परिणाम झाला. त्यामुळे यंदा मतदानाचा टक्का घसरल्याचं दिसून येतं. महाराष्ट्रात 55.48 टक्के मतदान झालं. तुरळक हिंसेच्या घटनांचा अपवाद वगळता राज्यात शांततेत मतदान पार पडलं. अनेक ठिकाणी शेवटल्या काही मिनिटांमध्ये मतदानासाठी रांगा लागल्या होत्या.
 
आता आपण सांगू या एक्झिट पोल बद्दल ... बीजेपी- शिवसेनेला 166 ते 194 जागा मिळण्याची शक्यता जाहिर करण्यात येत आहे. शिवेसनेला 57 ते 70 जागा... तर काँग्रस-एनसीपीला 72 ते 90 जागांवर समाधान मानवं लागेल असे दृश्य दिसत आहे.
 
2014 च्या निवडणुकीत भाजपला 123 जागा मिळाल्या होत्या जेव्हा की 63 जागांसह शिवसेना दुसर्‍या क्रमांकावर होती. बीजेपी-शिवसेना युतीला 186 शहायंशी जागा मिळाल्या होत्या. तेव्हा काँग्रेसच्या खात्यात 42 तर एनसीपीच्या खात्यात 41 जागा आल्या होत्या जेव्हा की 1 सीट इतरच्या खात्यात गेली होती.
 
राज्यात 8 कोटी 98 लाख 39 हजार 600 मतदार आहेत. 
 
आदित्य ठाकरे यांच्या वरळी मतदारसंघातल्या बूथ क्रमांक 62 वर ईव्हीएम मशिनमध्ये तांत्रिक अडचण उद्भवली. नंतर ते मशिन बदलण्यात आलं त्यानंतर मतदान सुरळीत पार पडल्याचं निवडणूक अधिकारी सुषमा सातपुते यांनी सांगितलं.
 
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दादरमधल्या बालमोहन विद्यामंदिरात मतदानाचा हक्क बजावला. यावेळी त्यांचे कुटुंबीयही उपस्थित होते.
 
अभिनेते शाहरूख खान आणि त्यांच्या पत्नी गौरी खान यांनी बांद्रा पश्चिम या पोलिंग बूथवर मतदान केलं आहे. या व्यतिरिक्त अनेक बॉलीवूड कलाकार दीपिका पादुकोण, गोविंदा, दिया मिर्जा, विवेक ऑबेरॉय, ऐश्वर्या रॉय, अभिषेक बच्चन, रितेश आणि जेनेलिया देशमुख, सचिन तेंडुकलर यांच्यासह अनेक स्टार्सने आपल्या मताधिकाराचा वापर केला.
 
आपल्या पुन्हा एकदा सांगू या इतर आता आपण सांगू या एक्झिट पोल बद्दल ... एका इतर अनुमानाप्रमाणे बीजेपी- शिवसेनेला 135 ते 142 जागा मिळण्याची शक्यता देखील दर्शवली जात आहे तर इतरला 22 ते 34 जागा मिळत असे दिसून येत आहे..   एकूण भाजप- शिवसेनेची वापसी होणार असे दृश्य निर्माण होत आहे...ही एक्गिझ पोलची माहिती... अंदाज... आता खरा परिणाम बघण्यासाठी वाट बघावी लागणार आहे 24 तारखेची...