मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. लोकसभा निवडणूक 2019
  3. लोकसभा निवडणूक निकाल 2019
Written By

नारायण राणे जाणार भाजपामध्ये, स्वाभिमानी पक्ष होणार अखेर विलीन

मागील अनेक महिने महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे संस्थापक अध्यक्ष आणि ज्येष्ठ नेते माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांचे काय होणार याचीच चर्चा सुरु होती,  ते आता रितसर भाजपमध्ये प्रवेश करत आहेत. महाराष्ट्र स्वाभिमान पक्षही भाजपमध्ये विलिन करणार असून,  त्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील राजकीय समीकरण बदलणार आहे. राणे भाजपमध्ये जाणार असल्याची माहिती खुद्द स्वत: राणे यांनी दिली आहे. 
 
राणे यांनी आपला पक्ष भाजपामध्ये विलीन करण्याचा मोठा निर्णय घेतला असून  १ सप्टेंबर रोजी नारायण राणे आपला पक्ष भाजपात विलिन करत भाजपमध्ये प्रवेश करतील.  राणे यांनी आपण १० दिवसांत मोठा निर्णय घेणार असल्याचे सांगितले आहे. भाजपासोबत राहायचे की नाही याचा निर्णय पुढील १० दिवसांत घेणार असल्याते त्यांनी म्हटले होते. आज त्यांनी भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे.  नारायण राणे यांच्या संभाव्य भाजप प्रवेशाच्या चर्चेने सिंधुदुर्ग जिल्यातील राजकीय वातावरण तापले आहे,  राणेंनी भाजप प्रवेश केल्यास कोकणातील राजीकय समीकरण पुन्हा एकदा बिघडणार आहेत.