कॉग्रेस गांधी कुटुंबीयांची गुलाम- राजनाथ
अडवाणी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे गुलाम असल्याची टीका कॉग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी केल्यानंतर आज भाजपने त्यांच्या या टीकेला उत्तर दिले असून, अख्खा कॉग्रेस पक्षच गांधी कुटुंबाचा गुलाम असल्याचे भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष राजनाथ सिंह यांनी म्हटले आहे. कॉग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी काही दिवसांपूर्वी अडवाणींवर चालवलेल्या टीकास्त्राचे आता बुमरँग झाले आहे. सोनिया गांधी या काचेच्या घरात राहतात त्यांनी दुसऱ्याच्या घरावर दगडफेक करण्याचा प्रयत्न करू नये असा टोलाही राजनाथ यांनी कॉग्रेसला लगावला आहे. आपला पराभव समोर दिसत असल्याने कॉग्रेस हताश झाली असून, पक्षाचे नेते निराशेपोटी अशा स्वरूपाचे विधान करत असल्याचे राजनाथ म्हणाले.