बुधवार, 4 डिसेंबर 2024
  1. वृत्त-जगत
  2. »
  3. निवडणूक
  4. »
  5. लोकसभा निवडणूक
Written By वार्ता|

तारकादळे अवतरली मतदानाला

PTIPTI
एरवी एसी गाडीशिवाय बाहेरही न पडणार्‍या बॉलीवूड कलावंतांनी आज भर उन्हात येऊन मतदानाचा हक्क बजावला. आमीर खान, जॉन अब्राहम, विद्या बालन तर सकाळीच मतदान करून मोकळे झाले.

अमिताभ बच्चन सहकुटुंब मतदानासाठी आले होते. अभिषेक, ऐश्वर्या व जया बच्चन यांनी यावेळी लोकांना मतदान करण्याचे आवाहन केले.

दिग्दर्शक करण जौहर, सोनाली बेंद्रे, सोनम कपूर, राहूल बोस, परेश रावल, माजी क्रिकेटपटू संदीप पाटील, गायिका पद्मजा फेणाणी जोगळेकर यांनीही मतदान केले.

आमीर खान सुटीवर गेला होता. मात्र, सुटी बाजूला ठेवून खास मतदानासाठी तो ४८ तासांचा प्रवास करून आला. मतदानाचा टक्का वाढावा म्हणून त्याने जाहिरातीही केल्या होत्या. त्यामुळे जाहिरातीत दिलेला संदेश त्याने अमलात आणला. आयपीएलमध्ये व्यस्त असलेल्या शाहरूख खाननेही मतदान केले. आयपीएलमध्ये त्याचा संघ मार खात असताना मतदानाची संधी साधून त्याने परत आल्याचेही बोलले जात आहे.