'उत्तर भारतीयांनो मुंबईत या'
हा देश सर्वांचा आहे. इथे कुठेही राहण्याचा आणि पोट भरण्याचा सर्वांना अधिकार आहे, त्यामुळे उत्तर भारतीय आणि बिहारींनी घाबरण्याची गरज नाही. तुम्ही येथे छटपूजाही करू शकतात आणि तुम्हाला कोण आडवतो ते मी पाहतो, असे प्रतिपादन राजद सुप्रिमो लालू प्रसाद यादव यांनी मुंबई येथील जाहीर सभेत केले आहे. मुंबईतील जोगेश्वरी येथे समाजवादी पक्षाचे नेते अबू आजमी यांच्या प्रचार सभेसाठी आलेल्या लालूंनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर कडाडून टीका केली. राज ठाकरे यांच्या सारखे लोक समाज फुटीचे विष पेरत असल्याचीही त्यांनी टीका केली. भाजपा नेता वरुण गांधी यांनी केलेल्या मुस्लिम विरोधी वक्तव्याचा समाचार घेताना वरुण यांचे वक्तव्य म्हणजे भाजपा आणि संघाचे वक्तव्य असल्याचे म्हटले आहे.