आज दुसर्या टप्प्यासाठी मतदान
लोकसभा निवडणुकीच्या दुसर्या टप्प्यासाठी आज (ता. २3) बारा राज्य व केंद्रशासित प्रदेशातील १४० मतदारसंघात मतदान होत असून १९ कोटी ४८ लाखांहून अधिक मतदार २०४१ उमेदवारांचे भवितव्य ठरवतील.या टप्प्यात महाराष्ट्रातील २५, आंध्रप्रदेशातील २०, उत्तर प्रदेशातील १७, मध्य प्रदेशातील १३, बिहारमधील १३, आसाममधील ११, ओरीसातील ११, झारखंडमधील ८, गोव्यातील २, त्रिपुरातील २ व जम्मू-काश्मीरमधील एका जागेसाठी मतदान होईल. दुसर्या टप्पयात जार्ज फर्नांडिस (मुजफ्फरपूर), राहुल गांधी (अमेठी), सुषमा स्वराज (विदिशा), शरद पवार (माढा), सुप्रिया सुळे (बारामती), रामविलास पासवान, (हाजीपूर) लालू प्रसाद यांचे मेव्हणे साधु यादव ( पश्चिम चंपारण), विनय कटियार (आंबेडकरनगर), गोपीनाथ मुंडे (बीड), सुरेश कलमाडी (पुणे), प्रकाश झा (पश्चिम चंपारण) आदी दिग्गज उमेदवारांचे भवितव्य जनताजनार्धन ठरवणार आहे. दुसर्या टप्प्यात सर्वाधिक उमेदवार बहूजन समाज पक्षाचे आहेत. १२२ उमेदवार या पक्षाचे आहेत. कॉंग्रेसचे ११७, भाजपचे ११३, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे २३, भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे १७, राष्ट्रीय जनता दलाचे १५ व मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे ९ उमेदवार आहेत.