दुसरा टप्प्यातील प्रचार तोफा थंडावल्या
राज्यातील 25 लोकसभा मतदारसंघातील प्रचाराच्या तोफा आज (मंगळवारी) संध्याकाळी थंडविल्या. आता मुंबई आणि ठाण्यातील प्रचाराचे घमासान सुरु होणार आहे.राज्यात दुसर्या टप्प्यासाठी 23 एप्रिल रोजी मतदान होणार आहे. या प्रचाराची सांगता मंगळवारी संध्याकाळी पाच वाजता झाली. आता दोन दिवस जाहीर प्रचार न होता गाठीभेटींवर उमेदवार भर देणार आहेत. राज्यात पहिल्या टप्प्यात 13 लोकसभा मतदार संघात 16 एप्रिल रोजी मतदान झाले होते. आता 23 रोजी 25 लोकसभा मतदार संघासाठी मतदान होणार असून उर्वरित 10 मतदार संघात 30 एप्रिल रोजी मतदान होणार आहे.