बुधवार, 4 डिसेंबर 2024
  1. वृत्त-जगत
  2. »
  3. निवडणूक
  4. »
  5. लोकसभा निवडणूक
Written By वार्ता|

भाचा वरुणच्‍या विरोधात अब्‍जाधीश मामा

भाजपचे फायर ब्रांड नेता वरुण गांधी यांच्‍या विरोधात देशातील सर्वांत धनाढ्य उमेदवार व्‍ही.एम. सिंह पीलीभीतमधुन कॉंग्रेसच्‍या तिकिटावर निवडणुकीत उतरले आहेत. नात्‍याने वरुण यांचे दुरचे मामा असलेल्‍या व्‍ही.एम. सिंह यांच्‍यावर अनेक गुन्‍हे दाखल आहेत. व्‍ही.एम. सिंह यांनी गुरुवारी आपला उमेदवारी अर्ज सादर केला. त्‍यात त्‍यांनी 632 कोटी रुपयांची संपत्ती जाहीर केली आहे.

वरुण यांच्‍या आई मनेका गांधी यांचे माम भाऊ असलेले सिंह यांच्‍या विरोधात दलीत अन्‍याय अत्‍याचार, वीज चोरी आणि कलम 144 च्‍या उल्लंघन केल्‍याचे अनेक गुनहे दाखल आहेत. दलीत शोषण प्रकरणी त्‍यांना जामीन मिळाला आहे.

उमेदवारी अर्जासोबत सादर केलेल्‍या प्रतिज्ञा पत्रानुसार सिंह यांच्‍याकडे लखनऊमध्‍ये एक घर, दिल्लीत 270 कोटी रुपये किंमतीची 180 एकर जमीन, भोपाळमध्‍ये 200 कोटी रुपयांची 100 एकर विवादास्‍पद जमीन, भोपाळमध्‍येच 100 कोटी रुपयांची 54 एकर जमीन, रायसेनमध्‍ये 36.60 कोटी रुपयांची 366 एकर जमीन आणि दिल्लीत सहा कोटी किंमतीची दीड एकर जमीन आहे.

याशिवाय दिल्लीच्‍या ग्रेटर कैलाश भागात सहा कोटी रुपये किंमतीचे चार हजार वर्ग फूट आकाराचे घर आणि भोपाळमध्‍ये पाच कोटी रुपये किंमतीचा बंगलाही आहे.

त्‍यांच्‍याकडे तीन लक्‍झरी कार असून त्‍यांची किंमत 14 लाख रुपये आहे. त्‍यांच्‍याकडे 15 लाख रुपये रोख आणि बँकेत 42.50 लाख रुपये आहेत.

यापूर्वी पश्चिम दिल्ली लोकसभा मतदार संघातील बहुजन समाज पार्टीचे उमेदवार दीपक भारद्वाज सर्वांत श्रीमंत होते. भारद्वाज यांनी आपल्‍याकडे 622 कोटींची संपत्ती असल्‍याचे जाहीर केले आहे.