गुरूवार, 5 डिसेंबर 2024
  1. वृत्त-जगत
  2. »
  3. निवडणूक
  4. »
  5. लोकसभा निवडणूक
Written By भाषा|

मतदानाचा वेग असमाधानकारक

लोकसभा निवडणुकीच्या दुसर्‍या टप्प्यात मतदानला सुरवात झाली असून आतापर्यंत असमाधानकारक मतदान होत असल्याचे सार्वत्रिक चित्र आहे. या टप्प्यात शरद पवार, राहूल गांधी, जॉर्ज फर्नांडिस, रामविलास पासवान, सुषमा स्वराज या दिग्गजांचे भवितव्य ठरणार आहे.

बारा राज्यात आज सकाळी मतदान सुरू झाले, ते पाच वाजेपर्यंत चालेल. फक्त नक्षलग्रस्त भागात तीन वाजेपर्यंतच मतदान असेल. १९ कोटींहून अधिक मतदार आज मतदानाचा हक्क बजावण्याची अपेक्षा आहे. या टप्प्यात १२१ महिला उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत.

या टप्प्यात आंध्र प्रदेश व ओरीसा या दोन विधानसभांसाठीचे मतदानही पूर्ण होणार आहे.