बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. लोकप्रिय
Written By
Last Modified: गुरूवार, 28 फेब्रुवारी 2019 (09:18 IST)

लक्षवेधी ठरत आहे अमिताभ बच्चन यांचे ट्‍विट

पुलवामा दहशतवादी हल्‍ल्‍याचा बदला घेत भारतीय हवाई दलाने पाकव्‍याप्‍त काश्‍मीरमध्‍ये बालाकोट स्‍थित दहशतवाद्‍यांचे तळ उद्‍ध्‍वस्‍त केले आहेत. त्यानंतर बॉलिवूड स्‍टार्सकडून ट्‍विट्‍स केले जात आहेत. यात महानायक अमिताभ बच्चन यांचे ट्‍विट सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे.  
 
अमिताभ बच्चन यांनी आपल्‍या ट्‍विटमध्‍ये एक अक्षरही लिहिलेले नाही. त्‍यांनी ११८ तिरंग्‍यांचे फोटोज (इमोजी) पोस्‍ट केले आहेत. अमिताभ बच्चन यांनी ११८ तिरंग्‍यांसोबत भारतीय सेनेला सलाम केला आहे. या तिरंग्‍यांसोबत बिग बी यांनी आपला एक फोटो शेअर केला आहे. बिग बींच्‍या या ट्‍विटवर सोशल मीडिया युजर्सनी आपल्‍या भावना व्‍यक्‍त केल्‍या आहेत.