सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. लोकप्रिय
Written By
Last Modified: शनिवार, 16 जुलै 2022 (11:27 IST)

Amruta Fadnavis New Song :अमृता फडणवीस यांचं नवं गाणं लवकरच

amruta fadnavis
राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी बँकर अमृता फडणवीस यांचं नवं गाणं लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत असल्याची माहिती खुद्द अमृता फडणवीस यांनी ट्विट करून दिली आहे. त्यांनी ट्विट मध्ये गाण्याचं पोस्टर शेअर केलं आहे. त्यांच नवीन गाणं 'वो तेरे प्यार का गम' हे गाणं लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. "लेकर आ रही हूँ एक यादगार गीत पुराना. लफ़्ज़ नए है, पर रंग वही सुहाना! असं ट्विट अमृता फडणवीस केलं आहे.
 
  
 अमृता यांनी हे गाणं गाण्याची संधी दिल्या बद्दल RPSG ग्रुप कंपनीला ट्विट करत आभार मानले आहे. या पूर्वी त्यांनी मनहारी, सुकुमारी, गणेश वंदना, आणि शिवतांडव स्रोत गायिले आहे. अमृता फडणवीस यांच्या चाहत्यांमध्ये त्यांच्या गाण्याबाबत उत्सूकता लागून राहिली आहे.