रविवार, 22 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. ट्रेडिंग
Written By
Last Modified: मंगळवार, 2 एप्रिल 2024 (14:43 IST)

80 वर्षाच्या वराने 34 वर्षाच्या वधूसोबत केले लग्न

खरंतर प्रेमात वयाचं बंधन नसतं.असेच काहीसे घडले आहे मगरियाचे राहणारे बालूसिंह सोबत. मध्य प्रदेशातील आगर माळवा जिल्ह्यातून एक अनोखी घटना समोर आली आहे. जिथे एका 80 वर्षांच्या वराने 34 वर्षांच्या वधूसोबत कोर्ट मॅरेज केले आहे. न्यायालयाच्या आवारात हनुमान मंदिरात एकमेकांना पुष्पहार घालून दोघांनी लग्न केले. बालू सिंह 80 वर्षांचे असून ते सोशल मीडियावर खूप सक्रिय आहेत.

तसेच, त्यांच्या  सोशल मीडिया अकाउंटवर हजारो फॉलोअर्स आहेत. त्यांची भेट सोशल मीडियावर महाराष्ट्रातील अमरावतीत राहणाऱ्या  शिलाबाई इंगळे यांच्याशी झाली.शीला यांचे वय 34 वर्ष आहे. त्यांच्यात मैत्रीचं नातं निर्माण झालं आणि नंतर दोघांनी एकत्र राहण्यासाठी लग्न करण्याचा निर्णय घेतला. त्यांनी कुटुंबियांच्या आणि न्यायालयीन कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत लग्न केले. लग्नांनंतर बाळू हे वधू शीलाला घरी घेऊन आले. दोघांच्या वयात 46 वर्षाचे अंतर असून देखील दोघेही आनंदी आहे. 
 
 Edited by - Priya Dixit