मंगळवार, 4 नोव्हेंबर 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. लोकप्रिय
Written By
Last Modified: बुधवार, 4 जुलै 2018 (09:39 IST)

भाजपा युवा नेत्याचे विदेशी तरुणीसोबतचा अर्धनग्न फोटो व्हायरल

bjp youth leader
भारतीय जनता पक्षाच्या (भाजप) गुजरातमधील एका युवा नेत्याचा विदेशी तरुणीसोबतचा अर्धनग्न फोटो व्हायरल झाला. गुजरात भाजपमध्ये या फोटोवरून मोठी वादावादी झाल्याची माहिती एका हिंदी वेबसाईटने दिली आहे.
 
भाजपचा युवा नेता दीपक वनिया याचा विदेशी तरुणीसोबतचा अर्धनग्न अवस्थेतील फोटो आहे. हा प्रकार समोर आल्यानंतर सुरेंद्रनगर जिल्ह्यातील भाजप नेत्यांनी दीपक वनिया याला त्याच्या खराब वर्तनामुळे गेल्या महिन्यात पदावरून हटवले आहे. दीपक हा वाधवान शहर भाजप युवा मोर्चाच्या सचिव पदावर होता. पोलिसांवर हल्ला करणे, दंगे भडकवण्याच्या आरोपांखाली सध्या तुरुंगामध्ये बंद आहे. दीपक वनियाचा वादग्रस्त फोटो ‘गर्वी गुजरात’आणि ‘बीजीपी गुजरात’या व्हॉट्सअप ग्रुपवर व्हायरल झाला. भाजप समर्थक चिराग पटेल हा ग्रुप सुरेंद्रनगर येथील हे चालवतात. चिराग यांनी वनिया याने हे फोटो व्हायरल झाल्यानंतर स्वत:च हे फोटो ग्रुपवर व्हायरल केल्याचे स्पष्टीकरण दिले आहे.