शिवजयंतीला ड्राय डे घोषित करा
राज्यात शिवजयंती दिनी ड्राय डे घोषित करा, अशी मागणी आमदार नितेश राणे यांनी केली आहे. दारू घरपोच मिळणार त्या पार्श्वभूमीवर आमदार नितेश राणे यांनी चंद्रकांत बावनकुळे यांना लक्ष्य करत राज्यात शिवजयंती दिनी ड्राय डे घोषित करा, अशी मागणी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन केली आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या 19 फेब्रुवारी या जन्मदिनी राज्यात ड्राय डे घोषित करा, अशी मागणी राणेंनी केली आहे. दारू घरपोच पोहचविण्याऐवजी येणाऱ्या शिवजयंतीपासून 19 फेब्रुवारी हा ड्राय डे घोषित करा, शिवछत्रपतींचे आशिर्वाद नक्कीच भेटतील बावनकुळेसाहेब!! असे ट्विट राणे यांनी केलं आहे. यासाठी जय शिवराय प्रतिष्ठानकडून नितेश राणेंना पत्रही देण्यात आले होते. तसेच हिवाळी अधिवेशनात हा विषय मांडावा आणि मंजूर करुन घ्यावा, असेही प्रतिष्ठानने आपल्या पत्रात म्हटले होते.