शनिवार, 4 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. लोकप्रिय
Written By
Last Modified: गुरूवार, 9 मार्च 2023 (14:02 IST)

भावनिक Video भाकरीवर मेणबत्ती लावून वाढदिवस

हल्ली दररोज सोशल मीडियावर कोणते न कोणते व्हिडीओ व्हायरल होत असतात. त्यापैकी काही मनोरंजक असतात तर काही भावनिक व्हिडीओ बघायला मिळतात. त्यातून काही व्हिडिओ तर थेट हृदयाला भिडतात. सध्या असाच एक इमोशनल व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे ज्यात एक भाऊ दुसर्‍याचा वाढदिवस भाकरीवर मेणबत्ती लावून साजरा करताना दिसत आहे.
 
महागडे केक घेण्याची आयपत नसली की पैशाशिवायही आनंद कसा साजरा करता येतो हे लहान भावांना बघून कळतं. या व्हिडिओत दोन गरीब लहान मुलं दिसत येत आहेत. एका मुलाच्या हातात भाकरी असून त्यावर त्याने दोन मेणबत्या लावल्या दिसत आहेत. भाकरीच्या मध्यभागी काही पातळ पदार्थ असल्याचेही दिसत आहे. मोठा मुलगा ही मेणबत्ती लावलेली भाकरी हातात ठेवून भावाला हॅपी बर्थडे टू यू भाऊ असं म्हणतो म्हणजे मोठा भाऊ लहान भावाचा वाढदिवस साजरा करताना दिसून येत आहे. दोन लहान भावांमधील प्रेम या व्हिडिओत पाहिल्यानंतर अनेकजण खूप भावूक झाले आणि ते दोघांवर आर्शीर्वादाचा वर्षाव करत आहेत.
 
Photo_gram143 नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरुन हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. अनेक यूजर्स व्हिडीओवर प्रतिक्रिया देत आपल्या भावना मांडत आहेत.