मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. लोकप्रिय
Written By
Last Modified: शनिवार, 28 जुलै 2018 (00:15 IST)

'ग्लोबल र्वॉंर्मिग'मुळे भारत गमावतोय थंड वातावरण

ग्लोबल वॉर्मिंगमुळे थंडी कमी होत असलेल्या नऊ सर्वाधिक लोकसंख्येच्या देशांमध्ये भारताचाही समावेश असल्याचे संयुक्त राष्ट्रांच्या नेतृत्वाखाली केलेल्या अध्ययनातून समोर आले आहे. यामुळे आरोग्य तसेच जलवायूचा धोका वाढू शकतो. धोरणकर्त्यांनी ही बाब लक्षात घेण्याची गरज आहे. आपल्या देशांना तत्काळ थंड ठेवण्यासाठी योग्य पावले उचलायला हवीत, असा सल्ला या अध्ययनातून देण्यात आला आहे. सरकार व गुंतवणूकदारांना सगळ्यांसाठी टिकाऊ शीतलता, साधान उपलब्ध करण्यातून मिळणारी उत्पादकता, रोजगार व वृद्धी लाभांसह विशाल वाणिज्य तसेच आर्थिक संधींचे आकलन करणे व त्यावर काम करण्यास सहकार्य करायला हवे. प्रोवाइडिंग सस्टेनेबल कुलिंग फॉर ऑल नावाचे हे पहिलेच अध्ययन असून त्यात जागतिक शीतलतेसमोरील वाढती आव्हाने व संधींचे आकलन करण्यात आले आहे. त्यात असे म्हटले आहे की, जागतिक पातळीवर सुारे 1.1 अब्ज लोक शीतलतेच्या कमतरतेच्या जोखमीची जोखीम उचलत आहे. शीतलता कोट्यवधी लोकांचे दारिद्र्य मिटविणे, मुलांना निरोगी ठेवणे, खापदार्थाध्ये पोषक घटक टिकवून ठेवणे, लस दीर्घकाळ प्रभावी ठेवणे व अर्थव्यवस्था मजबूत करण्यात मदत करते. उष्ण वातावरणाच्या विळख्यात असलेल्या 52 देशांतील आकडेवारीच्या आधारे हा अहवाल तयार करण्यात आला आहे. शीतलतेच्या अभावामुळे समस्यांचा सामना करत असलेल्या 1.1 अब्ज लोकांपैकी 47 कोटी लोक गरीब ग्रामीण भागातील आहेत. सकस आहार व औषधे त्यांच्यासाठी दुरापास्त आहेत.