रविवार, 29 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. लोकप्रिय
Written By
Last Modified: मंगळवार, 10 एप्रिल 2018 (08:25 IST)

आयआरसीटीसी अकाऊंटला आधार जोडा, १० हजार कमवा

आयआरसीटीसीने घर बसल्या १० हजार रुपये कमवण्याची संधी उपलब्ध झाली आहे. यासाठी कुठल्याही प्रकारची स्किम नाहीये आणि तिकिटही बूक करण्याची गरज नाहीये. केवळ तुमचा आधार नंबर आयआरसीटीसी  अकाऊंटसोबत लिंक करायचा आहे. कारण आयआरसीटीसी अकाऊंट सोबत आधार लिंक करणाऱ्या युजर्ससाठी एक लकी ड्रॉ काढण्यात येणार आहे. या लकी ड्रॉ मध्ये ज्याचं नाव येईल त्याला रेल्वे तर्फे १० हजार रुपयांचं बक्षीस दिलं जाणार आहे. 

आयआरसीटीसीने  ची ही स्किम जानेवारी २०१८ मध्ये सुरु करण्यात आली असून जुन २०१८ पर्यंत सुरु राहणार आहे. या लकी ड्रॉ स्किमनुसार विजेत्याला बक्षीस देण्यात येणार आहे. प्रत्येक महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात लकी ड्रॉ काढण्यात येणार आहे. प्रत्येक ड्रॉ मध्ये ५ भाग्यवान विजेत्यांची निवड करण्यात येणार आहे आणि त्यांना १० हजार रुपयांचं बक्षीस दिलं जाणार आहे. ही संपूर्ण प्रक्रिया कम्प्यूटराईज असणार आहे.

  • जे युजर्स रजिस्टर्ड आहेत आणि ज्यांनी आधार केवायसी केलं आहे तेच ही ऑफर घेण्यासाठी पात्र असतील. युजर्सला कमीत कमी एक पीएनआर बूक करावं लागणार आहे.
  • बुकिंग करणाऱ्या युजर्सची डिटेल त्याच्या आयआरसीटीसीवर बनवण्यात आलेल्या प्रोफाईलसोबत मॅच झाली पाहीजे.
  • ज्या युजर्सने आपली यात्रा रद्द केली आहे आणि टीडीआर फाईल केलं आहे असे युजर्स या स्किममध्ये सहभागी होऊ शकत नाहीत.
  • विजेत्यांची नावं आयआरसीटीसीच्या वेबसाईटवर महिन्याच्या सुरुवातीच्या आठवड्यात जाहीर करण्यात येतील. युजरला आपलं व्हेरिफिकेशन करणं आवश्यक आहे.
  • आयआरसीटीसीचे कर्मचारी या स्किममध्ये सहभागी होऊ शकत नाहीत.